|
डॉ. पी.एस. पाटील |
|
प्रा. सी.एच. भोसले |
|
डॉ. ए.व्ही. मोहोळकर |
|
डॉ. ए.व्ही. राव |
|
डॉ. जे.पी. जाधव |
|
डॉ. के.वाय. राजपुरे |
|
डॉ. के.एम. गरडकर |
|
डॉ. संजय लठ्ठे |
|
डॉ. सुशीलकुमार जाधव |
अमेरिकेतील स्टॅनफोर्ड
विद्यापीठाच्या ताज्या क्रमवारीत पुनर्मानांकन
कोल्हापूर, दि. १
नोव्हेंबर: जगभरातील आघाडीच्या
दोन टक्के संशोधकांची ताजी यादी अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठाने नुकतीच जाहीर
केली असून त्यामध्ये शिवाजी विद्यापीठाच्या नऊ संशोधकांना पुनर्मानांकन प्राप्त
झाले आहे.
स्टॅनफोर्ड विद्यापीठाने गत वर्षी जाहीर केलेल्या जागतिक स्तरावरील दोन टक्के
आघाडीच्या संशोधकांच्या यादीमध्येही शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांना स्थान लाभले
होते. यंदाही त्यांना पुनर्मानांकन लाभले आहे. यंदा स्टॅनफोर्डने वेगवेगळ्या
प्रकारच्या सूची जाहीर केल्या आहेत. त्यापैकी एक सूची संशोधकांच्या सार्वकालिक कारकीर्दीचा वेध घेऊन तयार केली आहे, तर दुसरी वार्षिक कामगिरीवर आधारित आहे. सार्वकालिक कामगिरीवर आधारित जाहीर केलेल्या यादीमध्ये विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पी.एस.
पाटील (पदार्थविज्ञान), डॉ. केशव राजपुरे (पदार्थविज्ञान), डॉ. ए.व्ही. राव (पदार्थविज्ञान),
प्रा. सी.एच. भोसले (पदार्थविज्ञान) आणि डॉ. ज्योती जाधव (जैवरसायनशास्त्र) यांचा
समावेश आहे. वार्षिक कामगिरीवर आधारित यादीमध्येही उपरोक्त संशोधकांचा समावेश
आहेच. त्यांच्यासह डॉ. ए.व्ही. मोहोळकर (पदार्थविज्ञान), डॉ. संजय लठ्ठे (नॅनो
सायन्स), डॉ. सुशीलकुमार जाधव (नॅनो सायन्स) आणि डॉ. के.एम. गरडकर (रसायनशास्त्र)
यांचा समावेश आहे.
‘स्कोपस’
डेटाबेसवर आधारित या यादीसाठी सन १९६० ते २०२१ या कालावधीमध्ये संशोधकीय योगदान
देणाऱ्या संशोधकांचा विचार करण्यात आला आहे. २२ विज्ञान विषय आणि १७६ उपविषयांमधील
संशोधनाची दखल त्याअंतर्गत घेतली गेली आहे. शोधनिबंधांची संख्या आणि दर्जा, संशोधन
पत्रिकेचा दर्जा, शोधनिबंधाला प्राप्त झालेली सायटेशन्स, एकच लेखक असणारे
शोधनिबंध, स्वतःची सायटेशन्स वगळून असणारे शोधनिबंध अशा अनेक काटेकोर निकषांवर
आधारित ही यादी जाहीर केली जाते.
विद्यापीठातील संशोधन जागतिक दर्जाचे: कुलगुरू डॉ. शिर्के
ए.डी. सायंटिफिक इंडेक्स क्रमवारीपाठोपाठ सलग दुसऱ्या दिवशी विद्यापीठीय
संशोधनाच्या जागतिक दर्जावर शिक्कामोर्तब करणारी वार्ता प्राप्त झाली आहे. एडी सायंटिफिक
इंडेक्स ही बहुतमुद्द्यांवर आधारित क्रमवारी आहे, तर स्टॅनफोर्डची क्रमवारी स्कोपस
आधारित आहे. या दोन्ही विभिन्न प्रकारच्या क्रमवारीमध्ये विद्यापीठाच्या
संशोधकांनी स्थान प्राप्त करणे यातून आपल्या संशोधनाचा बहुआयामी दर्जाही सिद्ध
होतो. या कामगिरीसाठी विद्यापीठातील या सर्वच संशोधकांचे अभिनंदन करताना अतीव आनंद
होतो आहे, अशी भावना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी व्यक्त केली आहे.
No comments:
Post a Comment