कोल्हापूर, दि.27 मार्च - डॉ.जयसिंगराव पवार इतिहासाचे संशोधन आणि लेखन हे आपले जीवनकार्य म्हणून अखंड संशोधन करीत होते. डॉ.पवार प्रमाण इतिहास लिहिणारे इतिहासकार होते. त्यादृष्टीने त्यांनी संपूर्ण आयुष्यभर वाटचाल केलेली आहे.शिवाजी विद्यापीठाच्या शाहू संशोधन केंद्राचे मानद संचालक म्हणून त्यांनी अत्यंत महत्वाची जबाबदारी पार पाडली. संशोधन केंद्रामध्ये त्यांनी भरीव योगदान दिलेले आहे.इतिहासामध्ये जे घडले आहे ते प्रामाणिकपणे पुराव्यानिशी लोकांपर्यंत मांडणारे मूर्तीमंत उदाहरण होते.त्यांच्या दु:खद निधनामुळे इतिहासाचे, शिवाजी विद्यापीठाचे न भरून येणारी हानी झालेली आहे.
डॉ.जयसिंगराव पवार यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहामध्ये आज शोकसभेचे आयोजन करण्यात आले.
इतिहास अधिविभागप्रमुख डॉ.अवनिश पाटील म्हणाले, डॉ.पवार दस्तएैवजांना महत्व देणारे, वस्तुनिष्ठ इतिहासाची मांडणी करणारे मान्यता प्राप्त इतिहासकार होते. आवश्यक तेव्हा इतिहासासंदर्भातील घडामोडींबाबत निर्णायक मत व्यक्त करीत होते.डॉ.पवार यांनी व्यक्त केलेल्या मताला संपूर्ण महाराष्ट्र राज्यात महत्वाचे स्थान होते.इतिहासाच्या क्षेत्रामध्ये संशोधन करणाऱ्या संशोधकांनी इतिहासाचा वारसा पुढे नेहणे ही मोठी जबाबदारी आहे.त्यांचे एक एक ग्रंथ हे स्वतंत्र प्रकल्प असल्याचे समोर आलेले आहे.
यावेळी कुलसचिव डॉ.विलास शिंदे यांनी शोकप्रस्तावाचे वाचन केले.वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभागप्रमुख डॉ.श्रीकृष्ण महाजन, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.रघुनाथ ढमकले, डॉ.निलांबरी जगताप, डॉ.देविकाराणी पाटील, सचिन घोरपडे यांनी शोकभावना व्यक्त केल्या.यावेळी व्यवस्थापन परिषद सदस्य अमरसिंग रजपूत, अधिविभागप्रमुख, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, सेवक, इतिहासप्रेमी जनता, विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होते.------


No comments:
Post a Comment