कोल्हापूर, दि. १४ जानेवारी: शिवाजी
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना लातूरच्या स्वातंत्र्यसैनिक कै. नारायणराव
भगवंतराव कुलकर्णी-गौरकर यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा ‘नारायणी
पुरस्कार-२०१८’ आज प्रदान करण्यात आला.
अशोक नारायण कुलकर्णी- लातूरकर यांच्या हस्ते आणि विनायक कुलकर्णी व
गुरूनाथ मिरजगावे यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार कुलगुरू डॉ. शिंदे यांना
त्यांच्या दालनात प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार गतवर्षी कुलगुरू डॉ. शिंदे
यांना जाहीर झाला होता. तथापि, पूर्वनियोजित बैठकीमुळे कुलगुरू पुरस्कार वितरण
समारंभाला उपस्थित राहू शकले नव्हते. त्यामुळे श्री. लातूरकर यांनी आज कोल्हापूर
भेटी दरम्यान त्यांना पुरस्कार प्रदान केला. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि रोख
१००१ रुपये असे पुरस्काराचे स्वरुप आहे. पुरस्काराची रक्कम कुलगुरू डॉ. शिंदे
यांनी विनम्रपणे परत केली आणि त्याचा विनियोग गरजू विद्यार्थ्यांसाठी करावा, अशी
अपेक्षा व्यक्त केली.
यापूर्वी, हा पुरस्कार राज्याचे माजी मुख्यमंत्री (कै.) विलासराव
देशमुख यांच्यासह भारताचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील, लातूरच्या स्वामी रामानंद
तीर्थ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. जी.एम. वाघमारे, साहित्यिक व सेवानिवृत्त
शिक्षणाधिकारी के.डी. कुलकर्णी आदींना देण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment