Sunday 15 August 2021

शिवाजी विद्यापीठात स्वातंत्र्यदिन उत्साहात


शिवाजी विद्यापीठात स्वातंत्र्यदिनानिमित्त कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.

स्वातंत्र्यदिनानिमित्त उपस्थितांना शुभेच्छा देताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्यासह अन्य अधिकारी.

शिवाजी विद्यापीठ स्वातंत्र्यदिन समारंभ (व्हिडिओ)


कोल्हापूर, दि. १५ ऑगस्ट
: शिवाजी विद्यापीठात आज स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्या हस्ते सकाळी ठीक आठ वाजता ध्वजवंदन करण्यात आले.

यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक जी.आर. पळसे, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एस.एस. महाजन, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राच्या संचालक डॉ. नमिता खोत, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक डॉ. एम.एस. देशमुख, कौशल्य व उद्योजकता विकास केंद्राचे समन्वयक डॉ. ए.एम. गुरव, विकास राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक अभय जायभाये, क्रीडा अधिविभाग प्रमुख डॉ. पी.टी. गायकवाड यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. या प्रसंगी संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत सादर केले. कोविड-१९ विषयक नियमांचे पालन करून कार्यक्रम करण्यात आला. कार्यक्रमाचा समारोप चहापानाने झाला.

No comments:

Post a Comment