कोल्हापूर, दि. १४ नोव्हेंबर: स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती शिवाजी विद्यापीठात आज उत्साहात साजरी करण्यात आली.
विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय
इमारतीमध्ये आज सकाळी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील
यांच्या हस्ते पंडित नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात
आले. या प्रसंगी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास शिंदे, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा
अधिष्ठाता डॉ.श्रीकृष्ण महाजन, क्रीडा
संचालक डॉ. शरद बनसोडे, विद्यापरिषद
सदस्य डॉ.जयवंत इंगळे, नेहरू
अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. प्रल्हाद माने यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच
विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
------
No comments:
Post a Comment