कोल्हापूर, दि.19 नोव्हेंबर - शिवाजी विद्यापीठात आज भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये आज सकाळी कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील यांच्या हस्ते इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी अहिंसा व एकतेची शपथ घेण्यात आली.या प्रसंगी मिड स्विडन विद्यापीठाचे प्रा.मॅग्नस् हयुमेलगार्ड, संशोधक डॉ.मनिषा फडतारे, डॉ.रोहन पाटील, कुलसचिव डॉ.विलास शिंदे, वित्त व लेखाधिकारी डॉ.सुहासिनी पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.अजितसिंह जाधव, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ.तानाजी चौगुले, अधिष्ठाता डॉ.श्रीकृष्ण महाजन, डॉ.महादेव देशमुख, डॉ.सरिता ठकार, डॉ.कैलास सोनवणे, आयक्यूएसी कक्षाचे संचालक डॉ.सागर डेळेकर, मराठी अधिविभागप्रमुख डॉ.नंदकुमार मोरे, डॉ.रणधीर शिंदे, तंत्रज्ञान अधिविभागाचे प्रभारी संचालक डॉ.प्रविणकुमार पाटील, बॅ.बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्त्रोत केंद्राचे संचालक डॉ.धनंजय सुतार,यांच्यासह संशोधक विद्यार्थी, अधिकारी व प्रशासकीय सेवक उपस्थित होते.
----
No comments:
Post a Comment