Tuesday, 26 November 2024

शिवाजी विद्यापीठात संविधान दिनानिमित्त उद्देशिका वाचन

 शहीद दिनानिमित्त शहीदांना अभिवादन

शिवाजी विद्यापीठात संविधान दिनाच्या अमृतमहोत्सवानिमित्त विद्यापीठाकडील संविधानाच्या दुर्मिळ मूळ प्रतीचे अवलोकन करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, कुलसचिव डॉ. विलास शिंदे व अन्य अधिकारी

शिवाजी विद्यापीठात शहीद दिनानिमित्त शहीदांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन प्रसंगी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी

शिवाजी विद्यापीठात संविधान दिनानिमित्त भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, शिक्षक आणि विद्यार्थी


(शहीद अभिवादन व उद्देशिका वाचन कार्यक्रमाची लघुचित्रफीत)

कोल्हापूर, दि. २६ नोव्हेंबर: शिवाजी विद्यापीठात आज अमृतमहोत्सवी संविधान दिनानिमित्त संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. त्याचप्रमाणे शहीद दिनानिमित्त शहीदांच्या पवित्र स्मृतींना अभिवादनही करण्यात आले.

विद्यापीठात आज सकाळी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत संविधानाच्या अमृतमहोत्सवानिमित्त उद्देशिकेस अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मुख्य प्रशासकीय भवनातील उद्यानात प्रस्थापित करण्यात आलेल्या संविधान उद्देशिका कोनशिलेसमोर जमून सर्वांनी तिचे सामूहिक वाचन केले. यावेळी विद्यापीठाच्या बॅ. बाळासाहेब खर्डेकर ग्रंथालयामधील संविधानाची मूळ प्रत सर्वांच्या अवलोकनार्थ प्रदर्शित करण्यात आली. कुलगुरू डॉ. शिर्के यांच्यासह विद्यार्थ्यांनी या दुर्मिळ प्रतीची आणि त्यामधील संविधान सभा सदस्यांच्या स्वाक्षरींची पाहणी केली.

यावेळी २६/११ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेले हेमंत करकरे, अशोक कामटे, तुकाराम ओंबाळे, मेजर संदीप उन्नीकृष्णन, शशांक शिंदे यांच्यासह इतर ज्ञात-अज्ञात शहीद सैनिकांच्या स्मृतिचिन्हांना पुष्प वाहून कुलगुरू डॉ. शिर्के यांच्यासह सर्वांनी त्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन केले.

यावेळी वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, डॉ. महादेव देशमुख, डॉ. तानाजी चौगुले, डॉ. धनंजय सुतार, डॉ. चेतना सोनकांबळे, डॉ. चंद्रकांत लंगरे, डॉ. प्रकाश बिलावर, डॉ. शिवराज थोरात, डॉ. कैलास सोनावणे, डॉ. निखिल गायकवाड, डॉ. किशोर खिलारे यांच्यासह शिक्षक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


No comments:

Post a Comment