राज्यशास्त्राच्या स्वयंअध्ययन साहित्याचे
प्रकाशन
शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विषयाच्या बी.ए. भाग-२च्या स्वयंअध्ययन साहित्याचे प्रकाशन करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, शिक्षक, लेखक आदी.
कोल्हापूर, दि. ६ ऑगस्ट: शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण
केंद्राच्या वतीने विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांमधील स्वयं अध्ययन साहित्य
लेखनाची परंपरा सर्वोत्तम असल्याचे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर
शिर्के यांनी केले.
दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून सुधारित
झालेल्या अभ्यासक्रमांप्रमाणे बी.ए.-भाग २ राज्यशास्त्र स्वयं अध्ययन साहित्याचा प्रकाशन
सोहळा व्यवस्थापन परिषद सभागृहात काल (दि. ५) झाला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी प्र-कुलगुरु डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, मानवशास्त्र
विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता
डॉ.ज्योती जाधव, राज्यशास्त्र अभ्यास मंडळ अध्यक्ष डॉ. रवींद्र भणगे, राज्यशास्त्र
विषयाचे घटक लेखक. दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राचे समन्वयक डॉ. चांगदेव बंडगर,
डॉ. सचिन भोसले, योगेश पवार, विकास पाटील उपस्थित होते.
कुलगुरू डॉ.शिर्के म्हणाले, विद्यार्थ्यांना वेळेत स्वयं अध्ययन साहित्य
देण्याने दूरशिक्षण हे नजीकचे शिक्षण होत आहे. दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या
वतीने तयार करण्यात आलेले स्वयंअध्ययन साहित्य सर्वच विद्यार्थ्यांना उपयोगी ठरणारे
आहे. हे स्वयंअध्ययन साहित्य इतर विद्यापीठे स्वीकारत असल्याने आपले लेखन महाराष्ट्रभर
चालले आहे. त्याचा फायदा राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना होत आहे. शिक्षकांनी आता
विद्यापीठासह विद्यार्थ्यांना देण्यासाठी व्यावसायिक पुस्तके तयार करावीत.
यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पाटील, कुलसचिव डॉ. शिंदे, अधिष्ठाता डॉ. देशमुख, डॉ.
भणगे, डॉ. सेलुकर यांनी मनोगते व्यक्त केली.
प्रकाशित स्वयंअध्ययन साहित्यामध्ये बी.ए. भाग-२ च्या सत्र ३ व ४ साठीच्या ‘भारतीय राजकीय
विचारवंत’ (संपादक डॉ. शार्दुल शेलुकर, डॉ. विजय देठे), ‘महाराष्ट्र शासन व महाराष्ट्रातील राजकीय
प्रक्रिया’ (संपादक अनिल मोहिते, डॉ. संतोष
खडसे), ‘निवडणूक व्यवस्थापन व माध्यमे आणि राजकारण’ (संपादक डॉ.
राहुल मांडणीकर, डॉ. रवींद्र भणगे) आणि ‘भारतीय लोकशाहीचा इतिहास’ (संपादक डॉ. रवींद्र भणगे) यांचा
समावेश आहे.
या कार्यक्रमात केंद्राचे संचालक डॉ. कृष्णा पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक
केले, तर उपकुलसचिव व्ही.बी.शिंदे यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment