कोल्हापूर, दि. २
जून: शिवाजी विद्यापीठात ग्राहकांच्या
सेवेसाठी कार्यरत असलेल्या कंझ्युमर्स स्टोअर्समार्फत विद्यापीठाच्या संशोधन
निधीसाठी सुमारे अडीच लाख रुपयांचा धनादेश काल कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्याकडे
सुपूर्द करण्यात आला.
कंझ्युमर स्टोअर्सच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष डॉ. पी.डी. राऊत यांच्या
हस्ते व उपाध्यक्ष डॉ. पी.एम. गुरव यांच्यासह संचालक मंडळाच्या उपस्थितीत हा
धनादेश प्रदान करण्यात आला.
शिवाजी विद्यापीठात
१९६७पासून येथील शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी यांच्या सुविधेसाठी ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर शिवाजी युनिव्हर्सिटी
सेंट्रल को-ऑप. कंझ्युमर्स स्टोअर्स लि. कार्यरत आहे. संस्थेने यंदा सुवर्णमहोत्सवी
वर्षात पदार्पण केले आहे. स्टोअर्सचा एकूण व्यवहार आता पाच कोटी रुपयांपर्यंत पोहोचला
असून कोल्हापूर, सांगली व सातारा या जिल्ह्यांमध्ये त्याचे कार्यक्षेत्र पसरले आहे. विद्यापीठातील
विविध विभागांसह, महाविद्यालयांना तसेच कर्मचाऱ्यांना त्यांच्या पसंतीप्रमाणे माल पुरवण्याची
परंपरा स्टोअर्सने पाळली आहे. विद्यापीठात शिक्षण व संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना
मदत व्हावी, या उद्देशाने संस्था दरवर्षी आपल्या नफ्यातील काही वाटा विद्यापीठाच्या
संशोधन फंडास देत असते. यंदाही संस्थेने अडीच लाख रूपये विद्यापीठास प्रदान करून
येथे चालणाऱ्या संशोधन कार्याला मदतीचा आपला खारीचा वाटा उचलला आहे.
कुलगुरू डॉ. देवानंद
शिंदे यांनी कंझ्युमर्स स्टोअर्सचे संचालक मंडळ व कर्मचारी यांचे आभार मानले व पुढील
वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, डॉ. व्ही. एन. शिंदे, संस्थेचे सरव्यवस्थापक
अवधूत पाटील, डॉ. डी. के. गायकवाड, डॉ. पी. एस. पाटील व श्री. काळे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment