Saturday, 3 June 2017

‘आव्हान-२०१७’: जल आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणास सुरवात














कोल्हापूर, दि. ३ जून: शिवाजी विद्यापीठात सुरू असलेल्या आव्हान-२०१७ या राष्ट्रीय सेवा योजनेच्या राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन शिबिरात आजपासून जल आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणास सुरवात करण्यात आली.
आज सकाळी आठ वाजता राजाराम तलावाच्या परिसरात भगव्या रंगाच्या पन्हाळा चमूला प्रशिक्षण देण्यास राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) जवानांनी सुरवात केली. निरीक्षक एस.डी. इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली दुपारी एक वाजेपर्यंत हे प्रशिक्षण चालले.
या प्रशिक्षणामध्ये सुरवातीला संपूर्ण चमूचे तीन गटांत विभाजन करून त्यांना उपलब्ध साहित्यापासून बचावकार्य करणे, दोर व बॅरलच्या सहाय्याने तराफा बांधणे तसेच जीवरक्षक लाँचमधून पाण्यातील बचावकार्य करणे आदी बाबींविषयी प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर प्रत्यक्ष सहभागी शिबिरार्थींनाच या सर्व गोष्टी करावयास लावण्यात आल्या.
उद्यापासून चार दिवस उर्वरित संघांना प्रत्येकी एक दिवस या प्रमाणे जल आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment