शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्यासमवेत संलग्नित गुणवंत महाविद्यालयांचे प्राचार्य. |
कोल्हापूर, दि. १ जुलै: सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षातील 'शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता शिष्यवृत्ती'प्राप्त गुणवंत महाविद्यालयांच्या प्राचार्यांचा आणि अधिविभाग प्रमुखांचा गुणगौरव समारंभ काल (दि. ३०) सायंकाळी विद्यापीठात संपन्न झाला.
वनस्पतीशास्त्र
अधिविभागाच्या नीलांबरी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. आर. के. कामत प्रमुख उपस्थित होते.
या समारंभात एकूण नऊ महाविद्यालये आणि एका अधिविभागाचा गुणगौरव करण्यात आला. यामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतून विद्यापीठाचा तंत्रज्ञान अधिविभाग, शिवराज कॉलेज ऑफ आर्टस् ॲन्ड कॉमर्स व डी. एस. कदम सायन्स कॉलेज, गडहिंग्लज, दुधसाखर
महाविद्यालय, बिद्री, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेतून देशभक्त
रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर, डॉ. घाळी कॉलेज, गडहिंग्लज, पद्मभुषण
वसंतरावदादा पाटील महाविद्यालय, कवठे महांकाळ (सांगली), मानव्यशास्त्र विद्याशाखेतून दि न्यू कॉलेज, कोल्हापूर, डी. आर. माने महाविद्यालय, कागल, पद्मभुषण डॉ. क्रांतीवीर नागनाथअण्णा नाईकवडी
आर्टस् कॉलेज, झरे तसेच आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेतून डेक्कन कॉलेज ऑफ इंटिरीअर
डिझाईन, कोल्हापूर यांचा समावेश होता. कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्या हस्ते सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांचा प्रशस्तीपत्र, शाल, श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे स्वागत व
प्रास्ताविक प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी केले, तर उपकुलसचिव श्रीमती बी.एम. नाळे यांनी उपस्थितांचे
आभार मानले. अभिजीत लिंग्रस यांनी सूत्रसंचालन केले. पदव्युत्तर प्रवेश विभागामार्फत
कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
No comments:
Post a Comment