शिवाजी विद्यापीठात वृक्षारोपण करताना सेवानिवृत्त कर्मचारी धनाजी कुंडले. सोबत कुलगुरू डॉ. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांच्यासह अधिकारी व कर्मचारी. |
शिवाजी विद्यापीठात वृक्षारोपण करताना सेवानिवृत्त कर्मचारी शिवाजी मोरे. सोबत कुलगुरू डॉ. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांच्यासह अधिकारी व कर्मचारी. |
कोल्हापूर, दि. १ जुलै:
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व राज्याच्या कृषीक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक
यांची जयंती आज शिवाजी विद्यापीठात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के,
प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्या हस्ते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस
पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन.
शिंदे, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, वाणिज्य व व्यवस्थापन
विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, विधी अधिविभागाचे प्रमुख डॉ.
व्ही.वाय. धुपदाळे, विधी अधिकारी अनुष्का कदम यांच्यासह अन्य अधिकारी व प्रशासकीय
सेवक उपस्थित होते.
यानंतर आजच्या कृषी दिनाचे औचित्य साधून विद्यापीठाच्या खुल्या व्यायामशाळा
परिसरामध्ये विद्यापीठाच्या मान्यवर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये धनाजी कुंडले, शिवाजी मोरे
यांचा समावेश राहिला. यापुढील काळात विद्यापीठाच्या प्रत्येक सेवानिवृत्त होणाऱ्या
कर्मचाऱ्याच्या हस्ते निवृत्तीच्या दिवशी एक रोप लावण्यात येईल, असे कुलगुरू डॉ.
शिर्के यांनी यावेळी सांगितले. या प्रसंगी कुलगुरू व प्र-कुलगुरूंसह अन्य
अधिकाऱ्यांनीही रोपे लावली. यात जांभूळ व बहावाच्या ४० रोपांचा समावेश आहे.
विद्यापीठाचा उद्यान विभाग व अभियांत्रिकी विभाग यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
No comments:
Post a Comment