कोल्हापूर, दि. ११ एप्रिल: महात्मा जोतीराव फुले यांची जयंती आज शिवाजी विद्यापीठात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ.विलास शिंदे, वाणिज्य व
व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. तानाजी चौगुले, दूरशिक्षण विभागाचे संचालक डॉ. दिनकर मोरे, तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक डॉ. शिवलिंगप्पा सपली, रसायनशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. कैलास सोनवणे, इंग्रजी अधिविभागप्रमुख डॉ. तृप्ती करेकट्टी, डॉ. औदुंबर सरवदे, डॉ. प्रभंजन माने, डॉ. राजश्री बारवेकर, दिपक भादले, डॉ. सुरेंद्र उपरे, डॉ. विजय सदामते, राहुल गुरव, अरविंद पाटील, सनी कुंभार, पवन कांबळे, श्रीमती सुषमा कदम, सुरेखा आडके, वैष्णवी जाधव यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. यावेळी इंग्रजी अधिविभागाच्या काही
विद्यार्थ्यांनी राष्ट्रपुरूषांच्या वेशभूषा केल्या होत्या.
No comments:
Post a Comment