|
शिवाजी विद्यापीठात पहिल्या शिवस्पंदन क्रीडा महोत्सवाचे रोपट्यास पाणी घालून उद्घाटन करताना प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील. |
|
शिवाजी विद्यापीठाची राष्ट्रीय फुटबॉलपटू प्रतीक्षा मिठारी हिने आणलेल्या क्रीडाज्योतीने स्पर्धेची ज्योत प्रज्वलित करताना प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह मान्यवर. |
|
शिवाजी विद्यापीठात शिवस्पंदन क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन सत्रात बॉक्सिंगची प्रात्यक्षिके सादर करताना क्रीडापटू |
|
शिवाजी विद्यापीठात शिवस्पंदन क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन सत्रात मल्लखांबाची प्रात्यक्षिके सादर करताना क्रीडापटू विद्यार्थिनी |
|
शिवाजी विद्यापीठात शिवस्पंदन क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन सत्रात मल्लखांबाची प्रात्यक्षिके सादर करताना क्रीडापटू विद्यार्थी |
|
शिवाजी विद्यापीठात शिवस्पंदन क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन सत्रात जिम्नॅस्टीक्सची प्रात्यक्षिके सादर करताना क्रीडापटू |
|
शिवाजी विद्यापीठात पहिल्या शिवस्पंदन क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी आकाशात फुगे सोडताना प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील आणि मान्यवर. |
कोल्हापूर, दि. १८ एप्रिल: क्रीडापटूंचे उत्कृष्ट संचलन,
विविध क्रीडाप्रकारांच्या प्रात्यक्षिकांचे सादरीकरण आणि ज्योत प्रज्वलन या
उपक्रमांनी आज सकाळी शिवाजी विद्यापीठाच्या पहिल्या ‘शिवस्पंदन क्रीडा महोत्सव-२०२३’चे शानदार उद्घाटन करण्यात आले.
विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी सकाळी ठीक आठ वाजता रोपट्यास पाणी
वाहून शिवस्पंदन क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन तसेच ध्वजवंदन केले. त्यानंतर
विद्यापीठाच्या विविध ११ अधिविभागांतील क्रीडापटूंनी उत्कृष्ट संचलन केले. यामध्ये
ऍग्रोकेमिकल अँड पेस्ट मॅनेजमेंट, जैव-रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, शिक्षणशास्त्र, गणित, इंग्रजी, सूक्ष्मजीवशास्त्र,
समाजशास्त्र, तंत्रज्ञान अधिविभाग आणि नॅनो विज्ञान व तंत्रज्ञान या अधिविभागांनी
सहभाग दर्शविला.
यावेळी विद्यापीठाची राष्ट्रीय फुटबॉलपटू प्रतीक्षा संजय मिठारी हिच्या हस्ते उद्घाटनस्थळी
क्रीडा ज्योतीचे आगमन झाले. आणि त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते शिवस्पंदन स्पर्धेची
ज्योत प्रज्वलित करण्यात आली. यावेळी क्रीडापटूंनी मुष्टीयुद्ध, मल्लखांब, जिम्नॅशियम तसेच रस्सीखेच या क्रीडा
प्रकारांची प्रात्यक्षिके सादर केली.
यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांनी सहभागी संघांना शुभेच्छा दिल्या. आकाशात
फुगे सोडून औपचारिक उद्घाटन झाल्याचे घोषित केले. प्रतीक्षा मिठारी हिने
सहभागी खेळाडूंना शपथ दिली. क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. अविराज कुळदीप यांनी सूत्रसंचालन
केले, तर डॉ. प्रकाश गायकवाड यांनी आभार मानले. यावेळी अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन,
आजीवन अध्ययन केंद्राचे संचालक डॉ. रामचंद्र पवार, राष्ट्रीय सेवा योजना संचालक
डॉ. तानाजी चौगुले, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. कांबळे, डॉ. रोकडे, डॉ. गिरी, संजय तोरस्कर आदी
उपस्थित होते.
No comments:
Post a Comment