कोल्हापूर, दि. २८ जुलै: चीनमधील चेंगडू येथे होणाऱ्या जागतिक आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी निवड झालेल्या शिवाजी
विद्यापीठाच्या पाच क्रीडापटूंचा कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते सत्कार
करून त्यांना स्पर्धेतील यशस्वितेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
चीनमधील चेंगडू येथे होणाऱ्या जागतिक आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाच्या पाच क्रीडापटूंची भारतीय
विश्वविद्यालय संघात निवड झाली आहे. विद्यापीठाच्या
इतिहासात जागतिक स्पर्धेसाठी पाच खेळाडूंची एकाच वेळी निवड होण्याचा हा
पहिलाच प्रसंग आहे. त्याबददल सदर क्रीडापटूंचा सत्कार आणि शुभेच्छा प्रदान कार्यक्रम शिवाजी
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते करण्यात
आला. यावेळी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू ओंकार कुंभार (नाईट कॉलेज ऑफ कॉमर्स इचलकरंजी, ८०० मी. धावणे), सिध्दांत पुजारी (आजरा महाविद्यालय, आजरा, ३००० मी. स्टीपल चेस), 3. सुदेष्णा शिवणकर (यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स, सातारा, १०० मी. धावणे व ४ बाय १०० मी. रिले), रेश्मा केवटे (डी. पी. भोसले महाविद्यालय, कोरेगाव, हाफ मॅरेथॉन) आणि राणी मुचंडी (डी. पी. भोसले महाविद्यालय, कोरेगाव, हाफ मॅरेथॉन) यांचा समावेश होता. तसेच, रिया नितीन पाटील हिने दक्षिण कोरिया येथे झालेल्या एशियन अंडर-२० अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप ४ बाय १०० रिले स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवल्याबददल तिचाही कुलगुरूंच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक डॉ. प्रकाश गायकवाड, क्रीडा संचालक डॉ.
शरद बनसोडे, डॉ. डी.बी. बिरनाळे, डॉ. धनंजय पाटील, श्रीमती स्मिता
कुंभार, अभिषेक मस्कर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment