कोल्हापूर, दि. १२
जानेवारी: शिवाजी विद्यापीठात आज
राजमाता जिजाऊ साहेब आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी
करण्यात आली.
शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के
आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते राजमाता जिजाऊसाहेब आणि स्वामी
विवेकानंद यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, वित्त व लेखाधिकारी
डॉ. सुहासिनी पाटील, मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, विद्यार्थी
विकास विभागाचे संचालक डॉ. प्रकाश गायकवाड, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ.
तानाजी चौगुले, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉ. धनंजय
सुतार, क्रीडा विभागाचे संचालक डॉ. शरद बनसोडे, आजीवन अध्ययन केंद्राचे संचालक डॉ.
रामचंद्र पवार, तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक डॉ. शिवलिंगप्पा सपली, रसायनशास्त्र
अधिविभाग प्रमुख डॉ. कैलास सोनावणे, डॉ. प्रशांत अनभुले, डॉ. पी.डी. पाटील, डॉ.
उदय पाटील, डॉ. इराण्णा उचडण, डॉ. अमृता मांजरेकर, डॉ. एन.जे. वलेकर, डॉ. पी.बी.
पाटील यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी आणि
विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment