Tuesday, 9 January 2024

शिवाजी विद्यापीठाच्या लोकपालपदी

न्या. सुधीर कुलकर्णी यांची नियुक्ती

 

न्या. सुधीर कुलकर्णी


कोल्हापूर, दि. ९ जानेवारी: प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश (सेवानिवृत्त) सुधीर पुरूषोत्तम कुलकर्णी यांची शिवाजी विद्यापीठाच्या प्रथम लोकपालपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. ही माहिती कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी दिली.

विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी), नवी दिल्ली यांच्या दि. ११ एप्रिल २०२३ रोजीच्या अधिसूचनेनुसार सर्व विद्यापीठांमध्ये विद्यार्थी तक्रार निवारण कक्ष व लोकपाल नियुक्ती करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. त्या अधिसूचनेतील तरतुदीनुसार मा. कुलगुरू यांनी शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी तक्रार निवारण कक्षाच्या निकालाबाबत अपिलीय अधिकारी व लोकपाल म्हणून निवृत्त न्या. सुधीर पुरूषोत्तम कुलकर्णी यांची नुकतीच नियुक्ती केलेली आहे. या नियुक्तीस त्यांनी स्वीकृती दर्शविली आहे.

न्या. कुलकर्णी यांनी बी.एस्सी. (ऑनर्स) व एल.एल.एम. पदवीनंतर मार्च १९८८मध्ये अहमदनगर येथे विधी सेवा रुजू केली. नांदेड येथून मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश पदावरुन ते सप्टेंबर २०१८मध्ये निवृत्त झाले आहेत.

No comments:

Post a Comment