कोल्हापूर, दि. ३
जानेवारी: क्रांतीज्योती
सावित्रीबाई फुले यांची जयंती आज शिवाजी विद्यापीठात मोठ्या उत्साहात साजरी
करण्यात आली.
विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवनाच्या प्रवेशद्वारी आज सकाळी कुलगुरू डॉ.
दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले
यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे
संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, वाणिज्य व
व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, मानव्यशास्त्र
विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ.
प्रकाश गायकवाड, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. तानाजी चौगुले, बॅ. बाळासाहेब
खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉ. धनंजय सुतार, क्रीडा विभागाचे संचालक डॉ.
शरद बनसोडे, आजीवन अध्ययन केंद्राचे संचालक डॉ. रामचंद्र पवार, भूगोल अधिविभागाच्या
डॉ. विद्या चौगुले, डॉ.
कविता वड्राळे यांच्यासह प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी
मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
No comments:
Post a Comment