![]() |
| शिवाजी विद्यापीठाच्या संख्याशास्त्र अधिविभागातर्फे आयोजित माजी विद्यार्थी मेळाव्यास उपस्थित माजी विद्यार्थ्यांना संबोधित करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. |
![]() |
| शिवाजी विद्यापीठाच्या संख्याशास्त्र अधिविभागातर्फे आयोजित माजी विद्यार्थी मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित आजी-माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी. (उपरोक्त दोन्ही फोटोंसाठी) |
कोल्हापूर, दि. ५ ऑक्टोबर: शिवाजी विद्यापीठाच्या संख्याशास्त्र अधिविभागाचे माजी विद्यार्थी हे
आपल्या कर्तृत्वाने विविध क्षेत्रांत झळकणारे तेजस्वी तारे आहेत. त्यांचा शिक्षक
म्हणून आम्हाला अतिशय अभिमान वाटतो, असे गौरवोद्गार कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के
यांनी आज काढले. विद्यापीठाच्या संख्याशास्त्र अधिविभागातर्फे आयोजित माजी
विद्यार्थी मेळाव्यात संबोधित करताना ते बोलत होते.
शिवाजी विद्यापीठाच्या संख्याशास्त्र अधिविभागात आज माजी विद्यार्थी
मेळावा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. हा कार्यक्रम कालच उद्घाटन
झालेल्या संख्याशास्त्र सभागृहात पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन अधिविभागाचे माजी
विद्यार्थी तसेच विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. दिगंबर शिर्के यांच्या प्रमुख
उपस्थितीत झाले. यावेळी विभागातील सेवानिवृत्त प्राध्यापक तथा कुलगुरू डॉ. शिर्के,
डॉ. डी. एन. काशीद आणि डॉ. एच. व्ही. कुलकर्णी
यांचा सत्कार करण्यात आला.
मेळाव्यात संख्याशास्त्र अधिविभागाचे १९८५ ते २०२५ पर्यंतच्या विविध
बॅचमधील सुमारे १४० माजी विद्यार्थी तसेच १०० आजी विद्यार्थी
सहभागी झाले. या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या
आठवणींना उजाळा देत विद्यार्थीदशेतील अनुभव,
शैक्षणिक प्रवास आणि व्यावसायिक यशोगाथा
मांडल्या. अधिविभाग आणि आजी विद्यार्थ्यांच्या कारकीर्दीसाठी आपले मार्गदर्शन व
सहकार्य सदैव उपलब्ध असेल, याची ग्वाही त्यांनी या प्रसंगी दिली.
या मेळाव्यानिमित्ताने माजी विद्यार्थी आणि विभागातील पीजी
विद्यार्थ्यांमध्ये संवाद सत्राचे आयोजन करण्यात आले.
यावेळी भावी करिअरच्या संधी,
सांख्यिकी शिक्षणाची उपयुक्तता आणि
उद्योग-जगतातील डेटा सायन्सचे महत्त्व या विषयांवर सखोल चर्चा झाली. माजी विद्यार्थी
समन्वयक डॉ. सोमनाथ पवार यांनी स्वागत व परिचयपर भाषण केले. विभागप्रमुख डॉ. शशीभूषण
महाडिक यांनी विभागाचा संक्षिप्त आढावा सादर केला. एस. व्ही. राजगुरू यांनी आभार
मानले.
या
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. सचिन पाटील, प्रा. संजय गांजवे,
संजय पाटील,
अमोल चव्हाण,
तुकाराम कांबळे,
उल्का दिंडे यांनी परिश्रम घेतले.



No comments:
Post a Comment