स्वप्नपूर्तीचे
समाधान: कुलगुरू डॉ.
दिगंबर शिर्के
![]() |
| शिवाजी विद्यापीठाच्या संख्याशास्त्र अधिविभाग सभागृहात फीत सोडवून प्रवेश करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह उपस्थित शिक्षक, अधिकारी आणि मान्यवर |
कोल्हापूर, दि. ४
ऑक्टोबर: संख्याशास्त्र अधिविभागासाठी अत्याधुनिक आणि प्रशस्त अशा सभागृह
उभारणीच्या रुपाने या विभागाच्या सर्वच पूर्वसुरींनी पाहिलेल्या स्वप्नाची पूर्तता
केल्याचे समाधान वाटत आहे, अशी कृतज्ञ भावना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.
दिगंबर शिर्के यांनी आज व्यक्त केली.
शिवाजी विद्यापीठाच्या
संख्याशास्त्र अधिविभागाच्या भव्य आणि आधुनिक सुविधांनी सुसज्ज सभागृहाचे उद्घाटन
आज करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. शिर्के
म्हणाले, आजचा दिवस खूप वेगळा आणि
महत्त्वाचा आहे. संख्याशास्त्र विषयाचे महत्त्व आज सर्वच क्षेत्रांत वाढले आहे.
आजचे युग डेटाचे आहे. त्यामुळे डेटा विश्लेषणाला मोठे महत्त्व आहे. त्यामुळे या
विषयाला प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. या
विद्यार्थ्यांच्या एकत्रित व्याख्यानांसाठी एका मोठ्या सभागृहाची आवश्यकता होती.
अधिविभागाच्या माजी अधिविभाग प्रमुख आणि शिक्षकांनी त्यासाठी सातत्यपूर्ण
पाठपुरावा केला. एका मोठ्या सेमिनार हॉलच्या मागणीची पूर्तता या अत्याधुनिक सभागृहाच्या
निर्मितीने होत आहे, हा या स्वप्नपूर्तीचा क्षण आहे. या सभागृहाचे काम एक वर्षाच्या आत पूर्ण करून अभियांत्रिकी विभागाने
उत्तम कामाचा नमुना सादर केला आहे. सभागृहाला आवश्यक अनेक बारकावे येथे
लक्षणीयरित्या साकारल्याचे दिसते. आरामदायक आसन व्यवस्थेसह उत्तम ध्वनीक्षेपण
व्यवस्था, लाइव्ह स्ट्रिमिंग इत्यादी अनेक सुविधा निर्मिल्या आहेत. हा सारा खटाटोप
चांगले विद्यार्थी घडावेत आणि देशाला सुजाण नागरिक मिळावेत, यासाठीच आहे. त्यामुळे
विद्यार्थ्यांनी आणि विद्यापीठाने या सुविधेचा वापर त्या दृष्टीने करावा, असे
आवाहन त्यांनी केले.
प्र-कुलगुरू डॉ. पाटील
यांनी या सभागृहामुळे विद्यापीठाच्या वैभवात एक नितांतसुंदर भर पडल्याची भावना
व्यक्त केली.
यावेळी सभागृहाचे
विविध प्रकारचे काम करणाऱ्या कंपन्यांचे प्रतिनिधी, ठेकेदार, अभियांत्रिकी व संगणक
विभाग यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. सोमनाथ पवार यांनी स्वागत केले. अधिविभाग
प्रमुख डॉ. शशीभूषण महाडिक यांनी प्रास्ताविक केले. तत्पूर्वी संख्याशास्त्र
अधिविभागाच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या हस्ते कोनशिला अनावरण करण्यात आले, तर
कुलगुरूंसह मान्यवरांच्या हस्ते फीत सोडवून इमारतीत प्रवेश करण्यात आला. कार्यक्रमास
कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव,
वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, वाणिज्य व व्यवस्थापन अधिष्ठाता डॉ.
श्रीकृष्ण महाजन, मानव्यशास्त्र विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, डॉ.
डी.एन. काशीद, डॉ. एच.व्ही. कुलकर्णी, डॉ. संतोष सुतार, डॉ. कृष्णा पाटील, संगणक
विभाग संचालक अभिजीत रेडेकर, अभियांत्रिकी उपकुलसचिव रणजीत यादव, डॉ. गिरीष
कुलकर्णी, कल्याण देवरुखकर, अमित कांबळे, विजय पोवार, शिवकुमार ध्याडे, रवी
सातपुते यांच्यासह संख्याशास्त्र अधिविभागाचे शिक्षक, अभियांत्रिकी, संगणक,
इंटरनेट आदी विभागांचे अधिकारी, प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी
मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संख्याशास्त्र
सभागृहाविषयी...
संख्याशास्त्र सभागृहाचे बांधकाम विद्यापीठाच्या
अभियांत्रिकी विभागामार्फत पूर्ण करण्यात आले आहे. सभागृह प्रतीक्षा लॉबी, व्ही.आय.पी.
कक्ष, स्वच्छतागृहे, वातानुकूलन यंत्रणा, अॅकॉस्टीक
पॅनेलिंग, प्रोजेक्टर, सी.सी.टी.व्ही.,
लाइव्ह स्ट्रिमिंग यंत्रणा इत्यादींनी सुसज्ज असून २३० इतकी आसनक्षमता आहे. इमारतीचे
क्षेत्रफळ ७६०० चौ. फुट इतके असुन या कामाचे वास्तुविशारद समीर जोशी आहेत. इमारतीच्या
बांधकामाचे ठेकेदार सुनिल नागराळे व विद्युत ठेकेदार साई इलेक्ट्रीकल्स आहेत. अंतर्गत
सजावटीचे ठेकेदार म्हणून अजिंक्य पाटील व तानाशी शिलोकर
यांनी काम पाहिले आहे.


No comments:
Post a Comment