Sunday, 9 August 2026

विद्यापीठात क्रांती दिनानिमित्त

स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन

 

शिवाजी विद्यापीठात क्रांती दिनानिमित्त क्रांतीवनातील स्मारकाला पुष्पचक्र वाहून अभिवादन करताना कुलगुरू डॉ. राजनीश कामत, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव. सोबत कुलसचिव डॉ. विलास शिंदे, डॉ. सावलीराम घाणे आदी.

शिवाजी विद्यापीठात क्रांती दिनानिमित्त क्रांतीवनातील स्मारकाला पुष्पचक्र वाहून अभिवादन प्रसंगी कुलगुरू डॉ. राजनीश कामत, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव. सोबत कुलसचिव डॉ. विलास शिंदे, डॉ. भारती पाटील, डॉ. सावलीराम घाणे आदी.


(क्रांतीदिन अभिवादन कार्यक्रमाची लघुचित्रफीत)

कोल्हापूर, दि. ९ ऑगस्ट: भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील ऐतिहासिक क्रांती दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठात स्वातंत्र्यसैनिकांना आणि हुतात्म्यांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्यात आले. विद्यापीठ परिसरातील 'क्रांतीवन' येथे हा कार्यक्रम झाला.

आज सकाळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत आणि प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांनी क्रांतीवनातील स्मृतीस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी सर्व उपस्थितांनी कवी कुसुमाग्रज यांच्या 'अनाम वीरा...' या अजरामर देशभक्तीपर गीताचे सामूहिक वाचन केले. डॉ. भारती पाटील यांनी याचे संयोजन केले. कुलगुरू डॉ. कामत यांनी देशसेवेसाठी सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृतींना उजाळा दिला. प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांनीही क्रांतीदिनाचे महत्त्व सांगत देशाच्या प्रगतीसाठी सर्वांनी योगदान देण्याचे आवाहन केले.

या वेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सावलीराम घाणे, डॉ. शशीभूषण महाडिक, डॉ. सोमनाथ पवार, डॉ. आलोक जत्राटकर, डॉ. संजय चोपडे, सुरक्षा अधिकारी वसंत एकले, सुरेखा अडके यांच्यासह प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment