![]() |
| स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला शिवाजी विद्यापीठात देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करताना संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी. |
कोल्हापूर, दि. १४ ऑगस्ट: भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त
शिवाजी विद्यापीठात उद्या कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांच्या हस्ते सकाळी आठ वाजता
विद्यापीठाच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात येणार आहे. यावेळी प्र-कुलगुरू डॉ.
ज्योती जाधव यांची प्रमुख उपस्थिती असेल. दरम्यान, आज स्वातंत्र्यदिनाच्या
पूर्वसंध्येला देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला.
ध्वजारोहण समारंभानंतर विद्यापीठ परिसरातून सायबर
चौक मार्गावरुन तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कुलसचिव डॉ. विलास
शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी
डॉ. सुहासिनी पाटील यांच्यासह विद्यापीठाचे सर्व अधिष्ठाता, विविध अधिविभागांचे
प्रमुख, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजनेचे
स्वयंसेवक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी होणार आहेत.
देशभक्तीपर गीतांचे
सादरीकरण
दरम्यान, हर घर तिरंगा अभियान
व वंदे मातरम् या राष्ट्रीय गीतास १५० वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आज विद्यापीठात देशभक्तीपर गीतगायनाचा
कार्यक्रम सादर करण्यात आला. विद्यार्थी विकास विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि
संगीत व नाट्यशास्त्र अधिविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे संयोजन
करण्यात आले. कुलगुरू डॉ. राजनीश कामत, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती
जाधव यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाची सुरवात
वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताने करण्यात आली. त्यानंतर कार्यक्रमात सारे जहाँ से
अच्छा, दे दी हमें आजादी, सैनिक हो तुमच्यासाठी, अब तुम्हारे हवाले, हर घर तिरंगा,
जहाँ डाल डाल पर इत्यादी सुमधूर देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करण्यात आले. राजर्षी
शाहू सभागृहात दोन तासांहून अधिक काळ हा कार्यक्रम चालला.

No comments:
Post a Comment