Saturday, 15 August 2026

शिवाजी विद्यापीठात स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण; तिरंगा रॅलीला प्रचंड प्रतिसाद



शिवाजी विद्यापीठात कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण झाले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

शिवाजी विद्यापीठात कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण झाले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

शिवाजी विद्यापीठात स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहण समारंभास मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्यांना शुभेच्छा देताना कुलगुरू डॉ. राजनीश कामत, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्यासह वरिष्ठ अधिकारी.

शिवाजी विद्यापीठातर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त विशेष तिरंगा रॅली काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून रॅलीला प्रारंभ करताना कुलगुरू डॉ. राजनीश कामत, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, कुलसचिव डॉ. विलास शिंदे आदी मान्यवर.

शिवाजी विद्यापीठातर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त विशेष तिरंगा रॅली काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून रॅलीला प्रारंभ करताना कुलगुरू डॉ. राजनीश कामत, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्यासह मान्यवर.

शिवाजी विद्यापीठातर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त काढण्यात आलेल्या विशेष तिरंगा रॅलीत सहभागी झालेले राष्ट्रीय छात्र सेनेचे छात्र.

शिवाजी विद्यापीठातर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त काढण्यात आलेल्या विशेष तिरंगा रॅलीला विद्यार्थ्यांसह सर्वच घटकांचा मोठा उत्साही प्रतिसाद लाभला.

शिवाजी विद्यापीठातर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त काढण्यात आलेल्या विशेष तिरंगा रॅलीला विद्यार्थ्यांसह सर्वच घटकांचा मोठा उत्साही प्रतिसाद लाभला.

(शिवाजी विद्यापीठाच्या स्वातंत्र्यदिन समारंभाची लघुचित्रफीत)


कोल्हापूर, दि. १५ ऑगस्ट: शिवाजी विद्यापीठात आज ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या निमित्ताने काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीला विद्यार्थी-विद्यार्थिनींचा प्रचंड उत्साही प्रतिसाद लाभला.

सकाळी ठीक आठ वाजता विद्यापीठाच्या प्रांगणात कुलगुरू डॉ. कामत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. ध्वजारोहणानंतर वंदे मातरम, राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत आणि विद्यापीठ गीताचे सामूहिक गायन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय छात्र सेनेच्या कॅडेट्सनी राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. यानंतर कुलगुरू डॉ. कामत यांनी प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्यास पुष्प वाहून अभिवादन केले. कुलगुरू डॉ. कामत आणि प्र-कुलगुरू डॉ. जाधव यांनी सर्व उपस्थितांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

त्यानंतर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यापीठाच्या मुख्य इमारतीपासून सायबर महाविद्यालयामार्गे तिरंगा रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये विद्यापीठाचे अधिकारी, शिक्षक, अधिविभागांचे प्रमुख, प्रशासकीय कर्मचारी, राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट्स, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले. भारत माता की जय, वंदे मातरम्, जय जवान-जय किसान, जय शिवराय इत्यादी घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले.

यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. राजाराम गुरव, मानव्यविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक डॉ. सागर डेळेकर, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सावळीराम घाणे, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. कबीर खराडे, क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. शरद बनसोडे, आजीवन अध्ययन केंद्राचे संचालक डॉ. रामचंद्र पवार, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉ. धनंजय सुतार, डॉ. अभिजीत गाताडे, व्यवस्थापन परिषद सदस्य सिद्धार्थ शिंदे, स्वागत परुळेकर, अधिसभा सदस्य विष्णू खाडे, सुरक्षा अधिकारी वसंत एकले आदी उपस्थित होते. चहापानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

No comments:

Post a Comment