कोल्हापूर, दि. २७ एप्रिल: विद्यार्थ्यांत समाजाभिमुख दृष्टीकोन
विकसित करण्यात राष्ट्रीय सेवा योजनेचे (एन.एस.एस.) मोठे योगदान असून केंद्र व राज्य
शासनाच्या विविध योजना व उपक्रमांच्या अंमलबजावणीत एन.एस.एस.ने अधिक सक्रिय योगदान
द्यावे, असे आवाहन कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या
राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे सन २०१५-१६मधील विद्यापीठस्तरीय पुरस्कार वितरण व सन
२०१६-१७ची कार्यनियोजन बैठक असा संयुक्त कार्यक्रम विद्यापीठाच्या राजर्षी शाहू
सभागृहात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
छोट्या-छोट्या गोष्टींतून
देशसेवा शक्य आहे, हे एनएसएससारख्या उपक्रमांतून सिद्ध झाले आहे. या सर्व
उपक्रमांकडे सकारात्मकपणे पाहण्याचा दृष्टीकोन समाजाच्या सर्व स्तरांत निर्माण
होण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर.
मोरे यांनी विद्यार्थ्यांच्या श्रमशक्तीच्या बळावर या जगात अशक्य असे काहीही नाही,
याची प्रचिती एनएसएसच्या उपक्रमांतून येते; तसेच, भरीव कार्याची उभारणी या माध्यमातून
होते, असे गौरवोद्गार काढले.
या प्रसंगी केआयटी
महाविद्यालयाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या शिवाजी विद्यापीठ एनएसएस
संकेतस्थळाचे कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. हे संकेतस्थळ
निर्माण करणाऱ्या टीमचा सत्कार त्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कुलगुरू डॉ.
शिंदे यांच्या हस्ते विद्यापीठ स्तरीय तसेच कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्हा
स्तरीय एनएसएस महाविद्यालयीन एकक, कार्यक्रम अधिकारी, स्वयंसेवक व स्वयंसेविका
यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. विद्यापीठाचे स्मृतिचिन्ह व ग्रंथभेट असे
सत्काराचे स्वरुप होते.
एनएसएसचे कार्यक्रम समन्वयक
डॉ. डी.के. गायकवाड यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सह-समन्वयक डॉ. सुरेश शिखरे
यांनी आभार मानले. यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांच्यासह एनएसएसचे
कोल्हापूर जिल्हा समन्वयक डॉ. डी.जी. चिघळीकर, सांगली जिल्हा समन्वयक डॉ. सदाशिव
मोरे, सातारा जिल्हा समन्वयक डॉ. एस.एन. जाधव आणि महाविद्यालयांचे प्राचार्य,
कार्यक्रम अधिकारी व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुरस्कारप्राप्त
मान्यवर व महाविद्यालयांची यादी पुढीलप्रमाणे-
No comments:
Post a Comment