कोल्हापूर, दि. ४
एप्रिल: जागतिक कीर्तीचे प्रख्यात स्थापत्यकार डॉ. व्ही.के. रैना येत्या बुधवारी (दि.
६ एप्रिल) शिवाजी विद्यापीठास भेट देणार असून ब्रिज इंजिनिअरिंगविषयी व्याख्यान
देणार आहेत. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात बुधवारी सकाळी ११ वाजता
व्याख्यान होणार असल्याची माहिती तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक डॉ. गिरीश
कुलकर्णी यांनी दिली आहे.
डॉ. व्ही.के. रैना
स्थापत्य अभियांत्रिकीमधील जागतिक कीर्तीचे नाव आहे. अभियांत्रिकी क्षेत्रात विशेषतः
पूलबांधणीच्या क्षेत्रात त्यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. सध्या ते आयसीटी
कन्सल्टंट्सचे प्रधान सल्लागार आहेत. तत्पूर्वी, त्यांनी आयटीएनएल कंपनीत तांत्रिक
संचालक तसेच बहरिन-कतार सी लिंक प्रकल्पाचे काम पाहणाऱ्या यूएस (पीडब्ल्यूए)
कंपनीसाठी तांत्रिक सल्लागार म्हणून काम पाहिले आहे. संयुक्त राष्ट्रसंघ आणि
जागतिक बँकेच्या अनेक प्रकल्पांवरही त्यांनी सल्लागार म्हणून काम पाहिले आहे. डॉ.
रैना आजघडीला सुमारे सोळा विविध देशांतील अभियांत्रिकीविषयक प्रकल्पांशी संबंधित कामे
पाहात आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकल्प निर्मिती व विकास या
क्षेत्रासही धोरणात्मक दिशा देण्याचे काम ते करीत आहेत. अभियांत्रिकीशी संबंधित
एकूण नऊ आंतरराष्ट्रीय पुस्तके त्यांनी लिहीली आहेत. त्यांचे अनेक शोधनिबंधही
प्रकाशित आहेत.
येत्या बुधवारी
शिवाजी विद्यापीठात डॉ. रैना 'ब्रिज इंजिनिअरिंग: रिपेअर ॲन्ड रेट्रोफिटींग ऑफ ब्रिजेस इन नेपाल
अर्थक्वेक्स' या विषयावर व्याख्यान देणार आहेत. या व्याख्यानाचा अभियांत्रिकी क्षेत्रातील
तज्ज्ञ, शिक्षक, विद्यार्थी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे
आवाहनही डॉ. कुलकर्णी यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment