कोल्हापूर, दि. ५ मे: शिवाजी विद्यापीठाचे प्रथम
कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार यांची जयंती आज विद्यापीठात मोठ्या उत्साहात साजरी
करण्यात आली.
कुलगुरू डॉ. देवानंद
शिंदे यांच्या हस्ते विद्यापीठ अतिथीगृहासमोरील डॉ. पवार यांच्या अर्धपुतळ्यास
पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय
इमारतीच्या पोर्चमध्येही मान्यवरांच्या हस्ते डॉ. पवार यांच्या प्रतिमेचे पूजन
करण्यात आले. 'डॉ. आप्पासाहेब पवार विद्यार्थी भवन' येथेही कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या हस्ते डॉ.
पवार यांच्या अर्धपुतळ्यास अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रभारी
कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, परीक्षा नियंत्रक महेश काकडे, विद्यार्थी कल्याण
संचालक डॉ. डी.के. गायकवाड, क्रीडा अधिविभाग प्रमुख पी.टी. गायकवाड, डॉ. जी.एस.
कुलकर्णी, डॉ. डी.टी. शिर्के, डॉ. जी.बी. कोळेकर, डॉ. पी.व्ही. अनभुले, डॉ. डी.बी.
शिंदे, श्रीमती डॉ. एन.एस. चव्हाण, प्रा. सी.एच. भोसले, प्राचार्य मानसिंगराव
जगताप, प्राचार्य अशोकराव जगताप, प्राचार्य डॉ. संभाजीराव कणसे, प्राचार्य एस.जे.
नाईक, डॉ. सी.टी. पवार, प्रा. अविनाश सरगर, प्राचार्य बी.एन. पाटील, अशोक साबळे
यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय सेवक व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment