कोल्हापूर, दि. १ मे:
महाराष्ट्र राज्याचा ५६वा स्थापना दिन शिवाजी विद्यापीठात आज मोठ्या
उत्साहात साजरा करण्यात आला.
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते आज सकाळी ध्वजवंदन करण्यात आले.
राष्ट्रगीतानंतर संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या विद्यार्थ्यांनी
महाराष्ट्र गीत सादर केले. यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, परीक्षा नियंत्रक महेश काकडे, वित्त व लेखाधिकारी अजित
चौगुले, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. डी.के. गायकवाड यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व सेवक तसेच विद्यार्थी
मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर कुलगुरू डॉ. शिंदे यांनी सर्व
उपस्थितांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
No comments:
Post a Comment