|
शिवाजी विद्यापीठात आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमाचे रोपट्यास पाणी वाहून उद्घाटन करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्यासह विद्यापीठाचे प्रमुख अधिकारी. |
|
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग सराव करताना (उजवीकडून) शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील. |
|
शिवाजी विद्यापीठात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित योग सराव प्रशिक्षणात सहभागी झालेले वरिष्ठ अधिकारी. |
|
शिवाजी विद्यापीठात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित योग सराव प्रशिक्षणात मोठ्या संख्येने सहभागी झालेले योगसाधक |
|
शिवाजी विद्यापीठात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित योग सराव प्रशिक्षणात सहभागी झालेल्या महिला योगसाधक. |
|
शिवाजी विद्यापीठात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित योग सराव प्रशिक्षणात सहभागी झालेले ज्येष्ठ नागरिक |
|
शिवाजी विद्यापीठात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित योग सराव प्रशिक्षणात सहभागी झालेले अधिकारी |
|
शिवाजी विद्यापीठात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित योग सराव प्रशिक्षणात सहभागी झालेले विद्यापीठाचे वरिष्ठ अधिकारी |
|
शिवाजी विद्यापीठात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित योग सराव प्रशिक्षणात मोठ्या संख्येने सहभागी झालेले योगसाधक |
|
शिवाजी विद्यापीठात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित योग सराव प्रशिक्षणात योगसाधना करताना योगसाधक |
कोल्हापूर, दि. २१ जून: शिवाजी विद्यापीठात
आज आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. कोविड-१९च्या
साथीमुळे दोन वर्षे ऑनलाईन स्वरुपात साजरा करावा लागल्यानंतर यंदा योग दिन
प्रत्यक्ष साजरा करण्यात येत असल्यामुळे योगसाधकांचा उत्साह ओसंडून वाहात होता.
शिवाजी विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग, राष्ट्रीय
सेवा योजना आणि आजीवन अध्ययन व विस्तार केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आज सकाळी
ठीक ७.२० वाजता विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहात आंतरराष्ट्रीय
योग दिन साजरा करण्यात आला.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू
डॉ. पी.एस. पाटील यांच्यासह प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, परीक्षा व मूल्यमापन
मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जधव, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, विज्ञान
व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. आर.के. कामत, विद्यार्थी विकास विभागाचे
संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक अभय जायभाये, आजीवन
अध्ययन व विस्तार केंद्राचे संचालक डॉ. ए.एम. गुरव, क्रीडा संचालक डॉ. पी.टी. गायकवाड आणि योग शिक्षक सूरज पाटील यांच्या
हस्ते रोपट्यास पाणी वाहून योग दिन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विविध
अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यासह आबालवृद्ध
योगसाधकांनी योग दिन उपक्रमात सहभाग घेतला. प्रशिक्षक सूरज पाटील यांनी योग
प्रात्यक्षिके सादर केली.
शिवाजी विद्यापीठाने पहिल्या आंतरराष्ट्रीय योग
दिनापासून विद्यापीठात दररोज सकाळी योग प्रशिक्षण शिबीर चालविले आहे. हे शिबीर
सर्व समाजघटकांसाठी संपूर्णतः मोफत व मुक्त आहे. यामध्ये दररोज साधारणपणे दोनशे
साधक सहभागी होतात. या शिबिराचा आठवा वर्धापनदिनही आज साजरा करण्यात आला.
दरम्यान, शिवाजी विद्यापीठाशी संलग्नित २९३
महाविद्यालयांमध्येही आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग प्रशिक्षण कार्यक्रमाचे
आयोजन करण्यात आले.
योग प्रात्यक्षिके ‘शिव-वार्ता’वर!
यावेळी कुलगुरू डॉ. शिर्के यांनी योगसाधकांना
आठव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त दीर्घायुरारोग्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कोविडच्या कालखंडानंतर यंदाच्या योग दिनानिमित्त एकत्र येण्याचा आनंद वेगळा
असल्याचे सांगून ते म्हणाले, योगसाधकांच्या सोयीसाठी योग प्रशिक्षक सूरज पाटील यांच्या
योग प्रात्यक्षिकांचे चित्रीकरण करून ते शिवाजी विद्यापीठाच्या ‘शिव-वार्ता’ या युट्यूब
वाहिनीवर कायमस्वरुपी उपलब्ध करून देण्यात येईल. त्याचा सर्व योगसाधकांना
निश्चितपणे लाभ होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
No comments:
Post a Comment