शिवाजी विद्यापीठात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन करताना मान्यवर. |
शिवाजी विद्यापीठात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन करताना मान्यवर आणि उपस्थित. |
कोल्हापूर, दि. २६
जून: शिवाजी विद्यापीठात आज
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये सकाळी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के
आणि प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज यांच्या
प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ इतिहास
संशोधक डॉ. जयसिंगराव पवार प्रमुख उपस्थित होते. त्याचप्रमाणे प्रभारी कुलसचिव डॉ.
व्ही.एन. शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, प्रभारी
वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.
श्रीकृष्ण महाजन, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, बॅ.
बाळासाहेब खर्डेकर ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल डॉ. डी.बी. सुतार, डॉ. भारती
पाटील, डॉ. निखिल गायकवाड, डॉ. अवनिश पाटील, डॉ. भारतभूषण माळी, डॉ. पी.एस. कांबळे, डॉ. पी.एन.
वासंबेकर, डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. देविकाराणी पाटील, डॉ. नीलांबरी जगताप, डॉ.
सोमनाथ पवार, 'कास्ट्राईब'चे आनंद खामकर आदींसह शिक्षक, प्रशासकीय सेवक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या
संख्येने उपस्थित होते.
यानंतर मान्यवरांनी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू संशोधन केंद्र येथेही
महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले.
No comments:
Post a Comment