श्रीनगर येथे स्तुति उपक्रमाच्या सांगता समारंभात काश्मीर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. निलोफर खान यांच्यासमवेत प्रा. राकेश सेहगल व प्रा. आर.जी. सोनकवडे. |
कोल्हापूर, दि. १
जून: येथील शिवाजी विद्यापीठाच्या पुढाकारातून श्रीनगर
येथील काश्मीर विद्यापीठात आयोजित ‘स्तुति’ प्रशिक्षण उपक्रमाची बुधवारी (दि.
२९ मे) यशस्वी सांगता झाली.
शिवाजी विद्यापीठ आणि केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय यांच्या सहयोगातून दि. २३ ते २९ मे या कालावधीत श्रीनगरच्या काश्मीर विद्यापीठात स्तुति (STUTI) प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला. सात दिवसांच्या या प्रशिक्षण कार्यक्रमात दीडशे प्राध्यापक व विविध संस्थांतील संशोधक, विद्यार्थी
सहभागी झाले. प्रशिक्षणात १४ तज्ज्ञ प्राध्यापकांनी अत्याधुनिक विश्लेषणात्मक
उपकरणांच्या तांत्रिक बाबी आणि वापराच्या अनुषंगाने २६ मार्गदर्शनपर व्याख्याने दिली.
शिवाजी विद्यापीठाच्या वतीने सैफ-सीएफसी विभागाचे प्रमुख डॉ. राजेंद्र सोनकवडे यांनी सैफ-सीएफसीमध्ये
उपलब्ध विविध अत्याधुनिक विश्लेषणात्मक उपकरणांचे प्रकार, तांत्रिक बाबी, मूलभूत तत्त्वे, वापरण्याच्या पद्धती तसेच औद्योगिक
क्षेत्रांसाठीचे त्यांचे
उपयोजन याविषयी मार्गदर्शन केले. या आधुनिक उपकरणांचा जम्मू-काश्मिरी
भागातील संशोधक व औद्योगिक क्षेत्रांनी लाभ घेण्याचे आवाहन
त्यांनी केले. त्यासाठी 'सृष्टी' वेब पोर्टलच्या
माध्यमातून ऑनलाईन नोंदणी व इतर संबंधित प्रक्रियेची माहितीही दिली.
या उपक्रमांतर्गत गुलमर्ग येथील अत्याधुनिक प्रयोगशाळेस क्षेत्रीय भेट (एक्झर्शन टूर) देण्यात आली. नोबेल पारितोषिक विजेते प्रा. ए. एच. कॉम्प्टन यांनी या प्रयोगशाळेत काम केले होते. या भेटीत लाईटिंग
प्रेडिक्शन या विषयावर व्याख्यान आणि प्रशिक्षण देण्यात आले.
या उपक्रमाच्या सांगता समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीनगर एनआईटीचे संचालक प्रा. राकेश सेहगल, काश्मीर विद्यापीठाच्या कुलगुरू श्रीमती डॉ. निलोफर खान, भौतिकशास्त्र विभागप्रमुख बशरत वांत, स्तुति प्रशिक्षण उपक्रमाचे चेअरमन प्रा. फराक मीर
उपस्थित होते.
No comments:
Post a Comment