Thursday, 12 December 2024

टीव्ही माध्यमात करिअरसाठी तंत्रस्नेही असणे आवश्यक: डॉ. प्रसाद ठाकूर

 पत्रकारिता विभागात टीव्ही प्रोडक्शनवर कार्यशाळा

पुणे येथील एफटीआयआयचे सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रसाद ठाकूर यांचे शिवाजी विद्यापीठातील कार्यशाळेत स्वागत करताना डॉ. निशा मुडे-पवार. डावीकडून डॉ. शिवाजी जाधवडॉ. आलोक जत्राटकर आणि शैलेश कोरे.


कोल्हापूर, दि. १२ डिसेंबर: टेलिव्हिजन माध्यम सर्वदूर पोहोचले आहे. या माध्यमाच्या विस्ताराबरोबरच यात अनेक तांत्रिक बदल होत आहेत. या बदलाची नोंद घेऊन कालसुसंगत, तंत्रस्नेही धोरण राबविल्यास या क्षेत्रात उत्तम करिअर करता येऊ शकते, असे मत पुणे येथील फिल्म अ‍ॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटचे सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रसाद ठाकूर यांनी व्यक्त केले.

शिवाजी विद्यापीठाच्या जर्नालिझम अ‍ॅन्ड मास कम्युनिकेशन विभागात दि. १२ ते 14 डिसेंबर या कालावधीत टेलिव्हिजन प्रोडक्शन विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विभागप्रमुख डॉ. निशा मुडे-पवार होत्या.

डॉ. ठाकूर म्हणाले, माध्यमांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर कमालीचा वाढला आहे. तंत्रज्ञान स्वीकारणे आणि त्यानुसार आपल्यात बदल करणे अपरिहार्य आहे. माध्यमांच्या ग्राहकांच्या गरजाही बदलत आहेत. या सर्वांचा विचार करून टीव्ही माध्यमात आले पाहिजे.

कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मुद्रीत, इलेक्ट्रॉनिक तसेच वेब माध्यमांचा त्यांनी आढावा घेतला. कृत्रिम बुद्धीमत्तेसह आलेले सर्वच तंत्रज्ञान सकारात्मक पद्धतीने वापरून तंत्रज्ञानावर स्वार झाले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

दुसर्‍या सत्रात शैलेश कोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. शिवाजी जाधव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. ऋतुराज दाभाडे यांनी आभार मानले.

 


No comments:

Post a Comment