Saturday, 7 December 2024

दिव्यांग मुलांमध्ये सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करणे आवश्यक: प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील

 

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांसमवेत प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, डॉ. प्रतिभा देसाई, डॉ. महादेव देशमुख आणि शिक्षक.

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष कार्यक्रमात दिव्यांग विद्यार्थ्यांशी संवाद साधताना प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील. मंचावर (डावीकडून) डॉ. प्रतिभा देसाई, डॉ. सुहासिनी पाटील आणि डॉ. महादेव देशमुख.

 

कोल्हापूर, दि. डिसेंबर: दिव्यांग मुलांमध्ये सकारात्मक दृष्टीकोन आणि मनामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी पालकांसह शिक्षकांनी आणि समाजातील सर्व घटकांनी विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे.  त्यांच्या हक्कांबद्दल समाजामध्ये जाणीव-जागृती निर्माण होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या युजीसी स्किम फॉर पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज् आणि समावेशी शिक्षण संसाधन केंद्र यांच्यामार्फत जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम तसेच उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. वित्त लेखाधिकारी डॉ.सुहासिनी पाटील यांची विशेष उपस्थिती होती. 

प्र-कुलगुरू डॉ.पाटील म्हणाले, आपल्याकडे जे नाही, त्याकडे दुर्लक्ष करून आपले उद्दीष्ट साध्य करण्यासाठी ध्यास घेतला पाहिजे. जागतिक स्तरावर दिव्यांग असून सुद्धा अलौकि यश संपादन करणाऱ्या अनेक व्यक्ती आहेत. या आदर्श व्यक्तींचे स्मरण करून आपल्या व्यंगावर मात करून पुढे जाण्यासाठी योग्य ती कार्यप्रणाली निर्माण केली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सांगितल्याप्रमाणे या जगामध्ये अशक्य असे काहीही नाही. प्रतिकूल परिस्थितीमध्येही अप्रतिम कामगिरी करणारे लोकच यशाच्या शिखरावर जातात. दिव्यांग शारीरिकदृष्ट्या दुर्बल असले तरी मानसिकदृष्ट्या त्यांनी सुदृढ राहिले पाहिजे. प्रयोगशील उपक्रमांच्या माध्यमातून बौद्धि उंची वाढविण्यासाठी मार्गदर्शन करणे ही आजची गरज आहे. सामाजिक लाभापासून वंचित राहता समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे. जीवन सुखकर बनविण्यासाठी कोणत्याही कलेची जोपासना करावी, असे आवाहन त्यांनी केले.

मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख म्हणाले, देशाच्या प्रगतीमध्ये दिव्यांग व्यक्तींचा सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहे. या मुलांमध्ये प्रचंड मोठी चेतना आणि ऊर्जा आहे. कौशल्यपूरकपणे आत्मसात केलेल्या शिक्षणामुळे त्यांच्या कलेला सर्वत्र उत्तम प्रतिसाद प्राप्त होत हे. सर्व प्रकारच्या व्हानांवर मात करून हे विद्यार्थी मार्गक्रमण करताना पाहून खूप कौतुक वाटते.

या कार्यक्रमा दिव्यांग विद्यार्थी-विद्यार्थिनींनी एकल व सामूहिक नृत्याचे सादरीकरण केले. श्रीमती रतन गुरव यांनी भावगीत सादर केले. युवराज मिठारी यांनी सुरेश ट यांची गझल सादर केली. या कार्यक्रमानंतर मान्यवरांच्या हस्ते उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

युजीसी स्किम फॉर पर्सन्स विथ डिझाबिलिटीज् आणि समावेशी शिक्षण संसाधन केंद्राच्या समन्वयक डॉ. प्रतिभा देसाई यांनी स्वागत प्रास्ताविक केले. निलोफर मुजावर आणि सुप्रिया वडर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी हेल्पर्स ऑफ दि हॅन्डीकॅप्ड, कोल्हापूर, श्री गणपतराव गाताडे मतिमंद विद्यालय, कागल, ज्ञानप्रबोधन संचलित अंध विद्यालय, कोल्हापूर येथील विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि शिक्षक सहभागी झाले. विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक, प्रशासकीय सेवक, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment