कोल्हापूर, दि. ३१ डिसेंबर: महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने
परित केलेल्या दि. २० डिसेंबर, २०२४ रोजीच्या शासन परिपत्रकास
अनुसरुन दि. १ ते १५ जानेवारी, २०२५ या कालावधीत "वाचन
संकल्प महाराष्ट्राचा" हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत शिवाजी
विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सिनेट सभागृहात उद्या, दि. १ जानेवारी २०२५ रोजी
सकाळी ११ ते १ या कालावधीत वाचन कौशल्य कार्यशाळा आणि पुस्तकाच्या सामूहिक वाचन
कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 'वाचन कौशल्य' या विषयावर राजाराम महाविद्यालयाचे प्रा. धनंजय देवळाणकर यांचे विशेष
व्याख्यान आयोजित करण्यात आलेले आहे. तसेच यानंतर, 'श्री
शाहुंचे चरित्र (श्रीशाहुचरितम्) आणि महात्मा गांधी यांच्या 'सत्याचे प्रयोग एवं आत्मकथा' या ग्रंथांचे सामूहिक वाचन
होणार आहे. ही माहिती संचालक डॉ. धनंजय सुतार यांनी दिली आहे.
दि. २ जानेवारी रोजी 'स्थानिक
लेखक परिसंवाद व नवसाहित्याची ओळख’ या उपक्रमाअंतर्गत महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या
स्मृतिदिनानिमित्त ‘अस्पृश्यता
निवारणाचे लढे’ या विषयावर कॉ. संपत देसाई यांचे व्याख्यान राजर्षी
शाहू सभागृहात सकाळी ११ ते १ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे.
दि. ३ ते ७ जानेवारी या कालावधीत ‘लेखक व विद्यार्थी वाचन संवाद' या उपक्रमाअंतर्गत
सदर कार्यक्रम सर्व अधिविभागांमध्ये स्वतंत्रपणे आयोजित करण्यात येणार आहेत.
दि. १६ व १७ जानेवारी रोजी विद्यापीठाच्या
दिक्षांत समारंभानिमित्त ग्रंथ दिंडी, ग्रंथप्रदर्शन आणि विक्री इत्यादी कार्यक्रम
बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञान स्रोत केंद्रामार्फत आयोजित केले आहेत.
दि. १६ जानेवारी रोजी विविध अधिविभागांमध्ये ‘पुस्तक
परीक्षण व कथन स्पर्धा’ हा कार्यक्रम
आयोजित करण्यात येणार आहे. यातील सर्वोत्तम प्रथम स्पर्धकाला राष्ट्रीय येवा योजना
विभागातर्फे दि. २६ जानेवारी रोजी प्रोत्साहनपर बक्षिस देऊन गौरविण्यात येणार आहे.
ग्रंथ प्रदर्शनास भेट देण्याचे आवाहन
वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमांतर्गत
शिवाजी विद्यापीठात विविध दुर्मिळ ग्रंथ, संदर्भग्रंथ आणि वस्तूंचे विशेष प्रदर्शन
दि. १ ते १५ जानेवारी २०१५ या कालावधीत आयोजित केले आहे. त्याचप्रमाणे या काळात
वाचकांना ग्रंथालयातील पुस्तके मोफत वाचता येणार आहेत. या संधीचा लाभ घेण्याचे
आवाहन डॉ. सुतार यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment