Friday, 6 December 2024

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन प्रसंगी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, डॉ. श्रीकृष्ण महाजन यांच्यासह उपस्थित शिक्षक, अधिकारी व कर्मचारी.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विद्यापीठात संविधान सभेतील चर्चेचे खंड तसेच डॉ. आंबेडकर केंद्रातर्फे प्रकाशित पुस्तकांचे प्रदर्शन मांडण्यात आले. त्याची पाहणी करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. सोबत (डावीकडून) डॉ. श्रीकृष्ण महाजन, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील आणि कुलसचिव डॉ. विलास शिंदे.


कोल्हापूर, दि. ६ डिसेंबर: शिवाजी विद्यापीठात आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतींना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.

विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्रामध्ये आज सकाळी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी केंद्रातर्फे संविधान सभेमधील चर्चेचे सर्व खंड तसेच केंद्रामार्फत प्रकाशित करण्यात आलेल्या ग्रंथांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. त्याची कुलगुरूंसह मान्यवरांनी पाहणी केली. यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, केंद्राचे संचालक तथा अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, डॉ. प्रकाश कांबळे, डॉ. कैलास सोनावणे, डॉ. के.एम. गरडकर, जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर, डॉ. किशोर खिलारे, अविनाश भाले यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment