Thursday, 26 December 2024

शिवाजी विद्यापीठात वीर बाल दिवस

 




कोल्हापूर, दि. २६ डिसेंबर: शिवाजी विद्यापीठात आज वीर बाल दिवसानिमित्त हुतात्मा बालकांना अभिवादन करण्यात आले. विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये आज सकाळी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र- कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते बाबा जोरावरसिंह आणि बाबा फतेह सिंह यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

गुरु गोविंद सिंह यांच्या बाबा जोरावर सिंह (९ वर्षे) आणि बाबा फतेह सिंह (७ वर्षे) या दोन लहान मुलांनी दिलेल्या बलिदानाचे प्रतीक म्हणून २६ डिसेंबर "वीर बाल दिवस" म्हणून साजरा केला जातो. सन 1705 मध्ये मुघलांनी या बालकांना त्यांच्या दोन मोठ्या भावांसह मारले होते. गुरू गोविंद सिंह आणि त्यांच्या कुटुंबीयांचे शौर्य आणि आदर्श यांचे या दिवशी स्मरण केले जाते.

या अभिवादन प्रसंगी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, रसायनशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. कैलास सोनवणे, जैवरसायनशास्त्र अधिविभागाच्या डॉ. ज्योती जाधव, डॉ. पद्मा दांडगे, डॉ. कल्याणराव गरडकर, डॉ. पंकज पवार, डॉ. एस. एस. काळे यांच्यासह संशोधक विद्यार्थी, अधिकारी व प्रशासकीय सेवक उपस्थित होते.

 

No comments:

Post a Comment