Saturday, 28 December 2024

‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रमांतर्गत शिवाजी विद्यापीठात सोमवारपासून ग्रंथप्रदर्शन


दुर्मिळ ग्रंथांच्या प्रदर्शनासह पंधरवड्यात विविध उपक्रमांचे आयोजन

कोल्हापूर, दि. २८ डिसेंबर: महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार शिवाजी विद्यापीठात ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमाचे दि. १ ते १५ जानेवारी २०२५ या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत विद्यापीठाच्या बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञान स्रोत केंद्रातर्फे सोमवारपासून दोनदिवसीय ‘ग्रंथप्रदर्शन’ आयोजित करण्यात आले आहे.

सदर ग्रंथप्रदर्शन बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञान स्रोत केंद्रामध्ये भरविण्यात येणार आहे. ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन सोमवार, दि. ३० डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते तसेच प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. ग्रंथ प्रदर्शनाची वेळ सकाळी १०.३० ते सायं ६ वाजेपर्यंत असणार आहे. या निमित्ताने दि.३० डिसेंबर २०२४ ते १५ जानेवारी २०२५ या कालावधीत ज्ञान स्रोत केंद्राच्या दुर्मिळ ग्रंथ विभागामध्ये दुर्मिळ ग्रंथांचे प्रदर्शनही सर्वांना पाहण्यास खुले असेल. वाचन संकल्प महाराष्ट्राचाउपक्रमांतर्गत दि. १ जानेवारी ते १५ जानेवारी २०२५ या कालावधीत सर्व वाचकांना आणि नागरिकांना बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञान स्रोत केंद्रातील वाचन साहित्य विनामल्य वाचनाकरिता उपलब्ध असेल.

दीक्षांत समारंभाचे औचित्य साधून दि.१६ जानेवारीपासून दोनदिवसीय व्यावसायिक प्रकाशन गृहांचे ग्रंथप्रदर्शन आणि विक्री आणि ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात सहभागी होऊन सर्वच घटकांनी वाचनसंस्कृती वृदि्धंगत करावी आणि वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम यशस्वी करावा, असे आवाहन प्रभारी संचालक डॉ. धनंजय सुतार यांनी केले आहे. 

 

इतर कार्यक्रमाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे:




No comments:

Post a Comment