Overall Champion Team: University of Mumbai |
Runner Up: Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University, Nagpur |
3rd position: Gurunanak Dev University, Amritsar |
4th position: Lovely Professional University, Punjab |
३२वा अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ राष्ट्रीय युवा महोत्सव (शिवोत्सव-२०१७)
कोल्हापूर, दि. १४
फेब्रुवारी: शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणात गेल्या १० फेब्रुवारीपासून रंगलेल्या ३२व्या
अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ राष्ट्रीय युवा महोत्सव अर्थात ‘शिवोत्सव-२०१७’मध्ये मुंबई विद्यापीठाने
सर्वसाधारण विजेतेपद, तर नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाने
उपविजेतेपद पटकावून महोत्सवावर महाराष्ट्राची मोहोर उमटवली. अमृसरच्या गुरूनानक
देव विद्यापीठाने तृतीय तर पंजाबच्या लव्हली प्रोफेशनल विद्यापीठाने चतुर्थ
क्रमांक पटकावला.
शिवाजी विद्यापीठाने शोभायात्रेत चतुर्थ क्रमांकासह सहभाग नोंदविलेल्या स्पॉट
फोटोग्राफी व मूकाभिनय या दोन्ही प्रकारांत अनुक्रमे प्रथम व चतुर्थ क्रमांक पटकावला.
प्रख्यात अभिनेते
सयाजी शिंदे यांच्या हस्ते व कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या
प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण करण्यात आले. यावेळी शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी
कुलगुरू डॉ. डी.आर .मोरे, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परीक्षा नियंत्रक महेश
काकडे, वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. आर.व्ही.
गुरव, भारतीय विद्यापीठ महासंघाचे सहसचिव डॉ. डेव्हीड सॅम्पसन, निरीक्षक डॉ.
एस.के. शर्मा उपस्थित होते.
शोभायात्रेमध्ये आंध्र
प्रदेशच्या कृष्णा विद्यापीठाचा प्रथम, आसामच्या गुवाहाटी विद्यापीठाचा द्वितिय तर
कुरूक्षेत्र विद्यापीठाचा तृतीय क्रमांक आला. कोल्हापूरचे शिवाजी विद्यापीठ आणि
कर्नाटकचे मैसूर विद्यापीठ यांना चतुर्थ क्रमांक विभागून देण्यात आला.
महोत्सवातील गटनिहाय
अनुक्रमे विजेते व उपविजेते विद्यापीठ अनुक्रमे पुढीलप्रमाणे:
संगीत: गुरुनानक देव विद्यापीठ,
अमृतसर; मुंबई विद्यापीठ, मुंबई
नृत्य: मणिपूर विद्यापीठ, मणिपूर; कुरूक्षेत्र विद्यापीठ, ठाणेसर,
हरयाणा
साहित्य: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
नागपूर विद्यापीठ, नागपूर; गुवाहाटी विद्यापीठ, आसाम
नाट्य: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद; एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई
ललितकला: मुंबई विद्यापीठ, मुंबई; गुलबर्गा विद्यापीठ,
कर्नाटक
यावेळी महोत्सवात
झालेल्या कलाप्रकारनिहाय निकालही घोषित करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक
डॉ. डी.के. गायकवाड यांनी निकाल घोषित केले.
No comments:
Post a Comment