Tuesday, 23 January 2018

जी.डी. बापूंकडून हयातभर सामाजिक प्रबोधनाचे कार्य: डॉ. अरुण भोसले





कोल्हापूर, दि. २३ जानेवारी: डॉ.जी.डी. बापू लाड यांनी समाज परिवर्तन आणि सामाजिक प्रबोधनासाठी संपूर्ण हयात वेचली. भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या चळवळी विविध स्तरांवर उभारलेल्या नेतृत्वांत डॉ.लाड यांचे नेतृत्त्व वैशिष्ट्यपूर्ण होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ.अरुण भोसले यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या गांधी अभ्यास केंद्रातर्फे क्रांतीअग्रणी डॉ. जी.डी. बापू लाड व्याख्यानमालेअंतर्गत 'जी.डी.बापू लाड: स्वातंत्र्य संग्रामातील एक झुंजार नेतृत्त्व' या विषयावर व्याख्यान आज झाले. त्यावेळी डॉ. भोसले प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. विद्यापीठाच्या मानव्यविद्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरु डॉ. डी.टी. शिर्के उपस्थित होते. अरुणआण्णा लाड यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
Dr. Arun Bhosale
डॉ. अरुण भोसले म्हणाले, भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे सूत्र सुरुवातीला प्रामुख्याने उच्च विद्याविभूषित लोकांकडे होते. त्या स्थित्यंतर आले ते महात्मा गांधी स्वातंत्र्य चळवळी उतरल्यानंतर. त्यानंतर पुढे हळूहळू स्वातंत्र्य चळवळीच्या कक्षा विस्तारत गेल्या. १९४२चे भारत छोडो आंदोलन मोठे जनआंदोलन होते. देशा चार ते पाच ठिकाणी प्रतिसरकारांची स्थापना झाली. प्रामुख्याने उत्तर प्रदेश महाराष्ट्रातील सातारा या ठिकाणी प्रतिसरकार जोरात होते. प्रतिसरकारच्या चळवळी डॉ.लाड यांची मध्यवर्ती भूमिका होती. सामान्य शेतकरी कुटुंबामध्ये जन्मलेले, डिलांचे छत्र हरपलेले जी.डी.बापू आपल्या बलाढ्य र्तृत्वाने पुढे कष्टकरी, गरीब जनतेचे आधारवड बनले. एस.एम. लोहियांच्या ंपर्कात आल्यानंतर पुढे त्यांनी राष्ट्रीय सेवादलाची स्थापना केली. या माध्यमातून त्यांना राष्ट्रीय प्रवाहाची ओळख झाली. त्यांची वैचारिक भूमिका या काळा तयार होत होती. बापूंचे कार्यक्षेत्र सातारा जिल्ह्यामध्ये राहिले. याच काळा क्रांतीसिंह नाना पाटील यांनी लोकजागृतीचे मोठे कार्य केले. बापूंनी वयाच्या १९व्या वर्षी राष्ट्रीय चळवळी सहभागी झाले. सातारा जिल्ह्याती बाराशे खेड्यांची चांगली माहिती बापूंना होती. ग्रामीण भागा ब्रिटीश सत्तेला मानणारा एक वर्ग म्हणजे वतनदार, पोलीस पाटील, सावकार, काळाबाजार करणारे व्यापारी, गावगुंड, खबरी हे सर्व ब्रिटीशांचे हस्तक होते. ग्रामीण भागातील ब्रिटीशांच्या या हस्तकांना उखडून काढल्याशिवाय ब्रिटीशांची सत्ता जाणार नाही, हे बापू ओळखून होते.  शेतकऱ्यांचे जीवन आनंदी करण्यासाठी, सामान्य माणसाच्या जगण्याला सुरक्षितता देण्यासाठी ब्रिटीश सरकार हद्दपार झाले पाहिजे, यासाठी त्यांनी आपल्या तुफान सेनेच्या मदतीने गावोगांवी लढा उभा केला. अंतर्गत वाद, दहशत, जुलूम मिटवून अनेकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले. जमीनदारी नाहीसे करुन गरजू शेतकऱ्यां मिनींचे फेरवाटप केले.  ब्रिटीश सरकारला नमविण्यासाठी जागोजागी प्रतिसरकार स्थापन केले. कोल्हापूरमध्ये राष्ट्रीय तालीम संघाची स्थापना केली. दोन हजार पैलवान त्यामध्ये सामील झाले. बेळगांवमध्ये युवक संघ, धुळे, नाशिक, मुंबई, विदर्भ, अमरावती, नागपूर या सर्व ठिकाणी प्रतिसरकारचे प्रतिनिधी होते. सांगलवाडी येथे प्रतिसरकारमधील तीनशे प्रतिनिधींची परिषद बापूंनी घेतली होती.  बापूंनी उत्तरयुष्या शोषणमुक्त समाज निर्मितीचा ध्यास घेतला. समाजाती शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, विद्यार्थी यांच्या हिसंबंधांसाठी वैचारिक प्रबोधन करण्याचे कार्य केल्याचेही त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणा प्र-कुलगुरु डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, ब्रिटीश हस्तकांपासून मुक्ती मिळवण्यासाठी बापूंनी प्रखरतेने लढा दिला. गरीब, शेतमजूर यांच्यावरील अन्याय निवारणासाठी बापूंना अनेकवेळा संघर्ष करावा लागला. या सर्वांमुळे समाजामध्ये बापूंबद्दल आदर निर्माण झाला.
गांधी अभ्यास केंद्राच्या समन्वयक डॉ.भारती पाटील यांनी प्रास्ताविक स्वागत केले. शितल भोसले यांनी सूत्रसंचालन केले तर नेहा वाडेकर यांनी आभार मानले.
यावेळी विद्यापीठाचे शैक्षणिक सल्लागार डॉ. डी.आर. मोरे, डॉ. एस.एन. पवार, प्राचार्य बी.एस. पवार, प्राचार्य य.ना. कदम, प्राचार्य प्रकाश कुंभार, प्राचार्य नलवडे, प्राचार्य आर.एच. पठाण, डॉ.नंदा पारेकर, दशरथ पारेकर, व्ही.वाय. पाटील, सुरेश शिपूरकर, अवनिश पाटील यांचेसह विविध अधिविभागातील विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment