शिवाजी विद्यापीठात प्रजासत्ताक दिनानिमित्तध्वजवंदन करताना प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. सोबत विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता व अधिकारी. |
शिवाजी विद्यापीठात
प्रजासत्ताक दिन उत्साहात
कोल्हापूर, दि. २६
जानेवारी: सुदृढ लोकशाहीसाठी कार्यरत राहू या, असा संदेश शिवाजी विद्यापीठाचे
प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने येथे
दिला.
शिवाजी विद्यापीठात
प्र-कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते आज सकाळी ठीक आठ वाजता प्रजासत्ताक
दिनानिमित्त ध्वजवंदन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. उपस्थितांना राष्ट्रीय
लोकशाही सप्ताहाच्या अनुषंगाने त्यांनी संदेश दिला. आपल्या संदेशात ते म्हणाले की,
भारतीय प्रजासत्ताकाच्या गेल्या ७२ वर्षांच्या वाटचालीत आपल्या लोकशाहीची लक्षणीय वाटचाल
झाली आहे. यापुढील काळातही सुदृढ व प्रगल्भ लोकशाहीसाठी आपण कार्यरत राहणे आवश्यक
आहे.
यावेळी विद्यापीठाचे
कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, शैक्षणिक
सल्लागार डॉ. डी.आर. मोरे, अधिष्ठाता डॉ. पी.डी. राऊत, डॉ. पी.एस. पाटील, डॉ.
भारती पाटील, डॉ. ए.एम. गुरव, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. आर.व्ही. गुरव,
राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड, क्रीडा विभागप्रमुख डॉ. पी.टी.
गायकवाड यांच्यासह विविध अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक, प्रशासकीय सेवक आणि
विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राधानगरी, गगनबावडा,
शाहूवाडी, आजरा, चंदगड, भुदरगड या तालुक्यांतल्या दुर्गम भागातील धनगरवाड्यांतील सुमारे
१५० विद्यार्थी-विद्यार्थिनींची उपस्थिती हे विद्यापीठातील आजच्या प्रजासत्ताक दिन
समारंभाचे एक मुख्य वैशिष्ट्य ठरले. उदय गायकवाड, प्रमोद पाटील यांच्यासह हिल
रायडर्स एन्ड हायकर्स ग्रुपच्या सदस्यांच्या समवेत या विद्यार्थ्यांनी ध्वजवंदन केले.
त्यानंतर प्र-कुलगुरू डॉ. शिर्के यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांनी त्यांची आस्थेने
चौकशी केली आणि सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
No comments:
Post a Comment