शिवाजी विद्यापीठाच्या वि.स. खांडेकर स्मृती संग्रहालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांसमवेत प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, शिक्षक, प्रशासकीय सेवक आदी. |
कोल्हापूर, दि. ११
जानेवारी: ज्येष्ठ साहित्यिक वि.स. खांडेकर यांच्या प्रतिभेमुळे मराठी भाषेचा गंध
सर्वदूर दरवळला, असे गौरवोद्गार शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. डी.टी.
शिर्के यांनी आज येथे केले.
वि.स. खांडेकर
यांच्या जयंतीनिमित्त विद्यापीठाच्या वि.स. खांडेकर स्मृती संग्रहालयातर्फे आयोजित
कार्यक्रमात ते बोलत होते.
डॉ. शिर्के म्हणाले,
खांडेकर यांच्या रुपाने मराठी भाषेला महान साहित्यिक लाभला. ज्ञानपीठ पुरस्कार लाभला.
त्यांचे साहित्य आजही कित्येक उदयोन्मुख साहित्यिकांसाठी प्रेरणास्थान आहे.
खांडेकर स्मृती संग्रहालयाच्या माध्यमातून त्यांच्या स्मृती पुढील पिढ्यांना
कायमस्वरुपी प्रेरणा देत राहतील, अशीच विद्यापीठाची त्यामागील भूमिका आहे.
प्र-कुलगुरू डॉ.शिर्के
यांच्या हस्ते यावेळी स्मृती संग्रहालयाविषयी तयार करण्यात आलेल्या ‘वि.स. खांडेकर स्मृती
संग्रहालय: एक दृष्टीक्षेप’ या चित्रफीतीचे प्रकाशन करण्यात आले. तसेच, संग्रहालयातर्फे
घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेच्या पारितोषिक विजेत्यांनाही त्यांच्या हस्ते
प्रशस्तीपत्र व ग्रंथ भेट देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या
सुरवातीला संग्रहालयाच्या प्रवेशद्वाराशी असलेल्या खांडेकर यांच्या पुतळ्यास डॉ.
शिर्के यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी
संग्रहालयाच्या संचालक डॉ. नीलांबरी जगताप यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर
उदयसिंह राजेयादव यांनी आभार मानले. यावेळी डॉ. रणधीर शिंदे, डॉ. नंदकुमार मोरे,
डॉ. तृप्ती करिकट्टी, डॉ. एम.एस. वासवाणी, सुप्रिया खबाले, अभिजीत सोकांडे, अमृता
कुलकर्णी-लुकतुके, राजश्री गिरी, सोनेश्वर सोलापुरे, ध२र्यशील राजेभोसले, दिग्विजय
राजेभोसले आदी उपस्थित होते.
संग्रहालयातर्फे
घेण्यात आलेल्या शालेय स्तरावरील निबंध स्पर्धेतील विजेते अनुक्रमे पुढीलप्रमाणे:-
मोठा गट: अनुष्का सयाजीराव राजेभोसले
(जय जोतिर्लिंग माध्यमिक विद्यालय, कोलोली), श्रृती संजय शेटे (वि.स. खांडेकर
प्रशाला, कोल्हापूर), पल्लवी रामचंद्र सुतार (जय जोतिर्लिंग माध्यमिक विद्यालय,
कोलोली).
लहान गट: संध्या राजाराम सांगवे,
श्रेया जयराम राऊत, कोमल अशोक सबरद (सर्व- वि.स. खांडेकर प्रशाला, कोल्हापूर)
माहितीपटाविषयी-
खांडेकर स्मृती
संग्रहालयाविषयी माहितीपटाची संकल्पना व निर्मिती राष्ट्रीय मोडी इतिहास प्रबोधिनीची
असून लेखन व दिग्दर्शन अभिजीत सोकांडे यांनी केले आहे. अमृता कुलकर्णी यांनी
निवेदन केले असून कृष्णात कांबळे यांनी कॅमेरामन म्हणून तर सूरज कांबळे यांनी
संकलन केले आहे. पंधरा मिनिटांच्या या माहितीपटात स्मृती संग्रहालयाच्या
वैशिष्ट्यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment