Tuesday, 2 October 2018

शिवाजी विद्यापीठाचे ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान उत्साहात

शिवाजी विद्यापीठात आयोजित स्वच्छता अभियानात  शिक्षक, प्रशासकीय सेवक यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन योगदान दिले.

शिवाजी विद्यापीठात आयोजित स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी विद्यार्थी-विद्यार्थिनींसमवेत कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे.

शिवाजी विद्यापीठात आयोजित स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी प्रशासकीय कर्मचाऱ्यांसमवेत कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के व अन्य मान्यवर.

कोल्हापूर, दि. २ ऑक्टोबर: शिवाजी विद्यापीठात दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वच्छता ही सेवा या अभियानांतर्गत विद्यापीठ परिसर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या अभियानाला शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, सेवक तसेच विद्यार्थ्यांचा अतिशय उत्साही प्रतिसाद लाभला.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, शैक्षणिक सल्लागार डॉ. डी.आर. मोरे व वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी साडेसात ते दहा या कालावधीत स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विद्यापीठ परिसर स्वच्छता अभियान यशस्वीरित्या राबविण्यात आले. रस्त्याकडेला वाढलेली काटेरी झुडपे, गवत, परिसरात पडलेला कचरा अशा प्रकारचा कचरा आज मोठ्या प्रमाणात साफ करण्यात आला.
गेल्या तीन वर्षांपासून स्वच्छता अभियानामध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टीकमुक्ती करण्यात आलेली असल्यामुळे तसेच परिसरात वावरणाऱ्या व्यक्तींच्या सजगतेमुळे विद्यापीठाचा परिसर हा बहुतांश प्लास्टीकमुक्त बनला आहे. त्याची प्रचिती यंदाच्या मोहिमेदरम्यानही आली. यंदा पावसाचे प्रमाण अधिक असल्यामुळे परिसरात गवत, खुरट्या वनस्पती आणि झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली. रस्त्याकडेला असणाऱ्या अशा बहुतांश झुडपांची आजच्या मोहिमेत सफाई करण्यात आली.
कोणत्याही औपचारिकतेशिवाय कुलगुरू डॉ. शिंदे यांच्यासह सर्वच अधिकाऱ्यांनी हातात खराटे, खुरपी घेऊन स्वच्छतेला सुरवात केली. मुख्य प्रशासकीय इमारतीमधील प्रशासकीय सेवकांनी त्यांना नेमून दिलेल्या एनसीसी भवन गेटपर्यंतच्या परिसरामध्ये तर अधिविभागांनी आपापल्या परिसराची स्वच्छता केली.
कुलगुरू डॉ. शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. शिर्के यांनी अन्य अधिकाऱ्यांसह पर्यावरणपूरक मोटारीतून विद्यापीठ परिसरातील प्रत्येक अधिविभागाला भेट देऊन त्या त्या ठिकाणी चाललेल्या स्वच्छता मोहिमेची पाहणी केली आणि शिक्षक व विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या कामासाठी प्रोत्साहित केले. सर्व सहभागी व्यक्तींचे, विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले.
अभियानानंतर मुख्य प्रशासकीय इमारतीच्या पोर्चमध्ये कुलगुरू डॉ. शिंदे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर गांधी अभ्यास केंद्राच्या संचालक डॉ. भारती पाटील यांनी उपस्थितांना अहिंसा, शांततेची शपथ दिली. त्यानंतर संगीत व नाट्यशास्त्र विभागातर्फे विशेष भजन कार्यक्रम सादर करण्यात आला.

विद्यापीठातर्फे शहरात सलग दोन दिवस स्वच्छता मोहीम
शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत गेले दोन दिवस कोल्हापूर शहरात विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यामध्ये रविवारी (दि. ३० सप्टेंबर) श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात तसेच सोमवारी (दि. १ ऑक्टोबर) मध्यवर्ती बस स्थानक आणि छत्रपती शाहू महाराज रेल्वे टर्मिनस परिसरात स्वच्छता मोहिमा राबविण्यात आल्या.
श्री महालक्ष्मी मंदिर परिसर स्वच्छता मोहीम
महालक्ष्मी मंदि परिसरातील मातृलिंग देवस्थान, मंदिराचे छत, घाटी दरवाजा, राजमंदिर परिसर, नगारखाना, जुना राजवाडा, जोतिबा रोड, महाद्वार रोड, संत गाडगे महाराज पुतळा आदी ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. यावेळी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, शैक्षणिक सल्लागार डॉ. डी.आर. मोरे, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, अजित चौगुले, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. डी.के. गायकवाड, विद्यापीठातील अधिकारी, प्रशासकीय सेवक, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, विद्यार्थिनी यांच्या बरोबरीने देवस्थान समितीचे विजय पवार, पुजारी समितीचे सल्लागार गणेश विश्वनाथ नेर्लेकर-देसाई, किशोर जाधव, धनाजी जाधव, हेमंत पोतनीस यांनी सक्रिय सहभाग घेतला. भवानी मंडप परिसरा विद्यार्थ्यांनी स्वच्छतेविषयी जागृतीपर पथनाट्य सादर केले. यावेळी नागरिक व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
छत्रपती शाहू महाराज रेल्वे टर्मिनस परिसरात स्वच्छता मोहीम राबविणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी
सोमवारी सकाळी छत्रपती शाहू महाराज टर्मिनस रेल्वे स्थान परिसर स्वच्छता अभियाना स्थानकासमोरील संपूर्ण परिसर, मारूती मंदिर परिसर, पोस्ट ऑॅफिस, मोटार स्टँ, रेल्वे स्टेशन बाग, रेल्वे स्टाफ क्वार्टर्स परिसर यांची स्वच्छता करण्यात आली. मध्यवर्ती बसस्थानक परिसरामधून प्लॅस्टिक पिशव्या, कागद, रॅपर्स, पाण्याच्या प्लॅस्टिक बाटल्या तसेच अन्य कचरा मोठ्या प्रमाणात गोळा करून स्वच्छता करण्यात आली. विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कोल्हापूर रेल्वेचे स्टेशन प्रबंधक ए.आय. फर्नांडिस, किशोर जाधव, अशोक कांबळे, डी.एस. जॉन, शिवनाथ बियाणी, संजय गायकवाड यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्याचप्रमाणे गेल्या पंधरवड्यात विद्यापीठातर्फे प्रशासकीय स्तरावर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यामध्ये प्रशासकीय विभागांसह विविध अधिविभागांमध्येही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेलाही विद्यापीठातील सर्वच घटकांचा अतिशय उत्साही व सकारात्मक प्रतिसाद लाभला.

No comments:

Post a Comment