शाहू स्मारक भवनात ‘मोहनदास ते महात्मा’ प्रदर्शनाचे उद्घाटन;
६ ऑक्टोबरपर्यंत पाहण्यासाठी
खुले
कोल्हापूर, दि. १
ऑक्टोबर: ‘मोहनदास ते महात्मा: गांधींचे दक्षिण आफ्रिकेतील वास्तव्य’ या छायाचित्र प्रदर्शनामुळे
इतिहासापासून वर्तमान उज्ज्वल करण्याची प्रेरणा आजच्या तरुणांना मिळेल, असे
प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज येथे केले.
शिवाजी
विद्यापीठाच्या गांधी अभ्यास केंद्राच्या वतीने येथील दसरा चौकातील शाहू स्मारक
भवनाच्या प्रदर्शनगृहात महात्मा गांधी यांच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती
वर्षानिमित्त त्यांच्या दक्षिण आफ्रिकेतील वास्तव्य काळातील दुर्मिळ छायाचित्रांचे
प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या
हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के प्रमुख उपस्थित
होते.
कुलगुरू डॉ. शिंदे
यांनी प्रदर्शनाच्या संकल्पनेचे कौतुक केले. ते म्हणाले, या प्रदर्शनाच्या
माध्यमातून मोहनदास करमचंद गांधी या बॅरिस्टर व्यक्तीचा महात्मा होण्यापर्यंतचा
प्रवास कसा झाला, याची विलक्षण माहिती दर्शकास मिळते. आपल्याला माहिती असलेल्या
गांधीजींपेक्षा एक वेगळे गांधी या प्रदर्शनातून आपल्याला दिसतात. हेच या
प्रदर्शनाचे वैशिष्ट्य आहे.
या वेळी
विद्यापीठाचे वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक
चौसाळकर, प्रा. किशोर बेडकीहाळ, अधिष्ठाता डॉ. पी.एस. पाटील, डॉ. पी.डी. राऊत, डॉ.
भारती पाटील, अधिसभा सदस्य संजय जाधव, समाजशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. जगन कराडे
यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हे प्रदर्शन ६
ऑक्टोबरपर्यंत सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहणार असून त्याचा
कोल्हापूरवासियांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन गांधी अभ्यास
केंद्राच्या समन्वयक डॉ. भारती पाटील यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment