कोल्हापूर, दि. १८ सप्टेंबर: विद्यार्थी विकास
विभागासाठी स्वतंत्र वसतिगृह इमारतीच्या पूर्ततेमुळे विद्यार्थ्यांची अनेद
दिवसांची मागणी मार्गी लावल्याचे समाधान वाटत आहे, अशी भावना शिवाजी विद्यापीठाचे
कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी व्यक्त केली.
शिवाजी विद्यापीठात
विविध महोत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी उपक्रमांसाठी संलग्नित महाविद्यालये
आणि राज्यासह देशभरातील विविध विद्यापीठांतील विद्यार्थी येत असतात. या
विद्यार्थ्यांच्या निवास व्यवस्थेसाठी स्वतंत्र इमारत असावी, अशी मागणी
विद्यार्थ्यांतून होती. त्याची दखल घेत विद्यापीठाने विद्यार्थी विकास विभागासाठी
स्वतंत्र वसतिगृह इमारत बांधण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सदर इमारत बांधण्यात
आली. आज कुलगुरू डॉ. शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते तिचे
उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी कुलगुरू बोलत होते.
ते म्हणाले, विद्यार्थी
विकास विभागासाठी एक देखणी आणि आदर्श अशी वास्तू उभारली आहे. ती विद्यार्थ्यांना
निश्चित आवडेल. येथील निवास आणि सराव त्यांना नेहमी स्मरणात राहील. विभागाचे माजी
संचालक डॉ. राजाराम गुरव यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याबद्दल त्यांचेही
कुलगुरूंनी अभिनंदन केले.
यावेळी सार्वजनिक
बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित तोंदले, वास्तुविशारद आदित्य बेगमपुरे,
ठेकेदार संजय पाटील, आरसीसी कन्सल्टंट अभिजीत देशमुख, विद्युत कंत्राटदार राम
खन्नुकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास कुलसचिव डॉ.
विलास शिंदे, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.
रघुनाथ ढमकले, स्वागत परुळेकर, डॉ. राजाराम गुरव, डॉ. गिरीष कुलकर्णी, उपकुलसचिव
रणजीत यादव, अमित कांबळे, विजय पोवार, वैभव आर्डेकर, शिवकुमार ध्याडे यांच्यासह
सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच विद्यापीठाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने
उपस्थित होते. विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. तानाजी चौगुले यांनी सर्वांचे
आभार मानले.
इमारतीविषयी थोडक्यात...
सदर इमारतीच्या
तळमजल्याचे काम पूर्ण झाले असून तिचे क्षेत्रफळ ७७१.७९ चौरस मीटर इतके आहे. येथे
एका डॉर्मिटरीसह एक उपाहारगृह आणि ४ स्वच्छतागृहे आहेत. साठ विद्यार्थ्यांच्या
राहण्याची सोय येथे होऊ शकते.
![]() |
| विद्यार्थी विकास विभागाचे नूतन वसतिगृह |


No comments:
Post a Comment