| शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडा वसतिगृहाचे उद्घाटन करताना क्रीडा अधिविभागाचे विद्यार्थी. सोबत कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्यासह उपस्थित मान्यवर. |
| शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडा वसतिगृहामध्ये फीत सोडवून प्रवेश करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह मान्यवर |
विद्यापीठाचे क्रीडा
वसतिगृह तळमजला अधिक तीन मजले असे प्रस्तावित असून पहिल्या टप्प्यात तळमजल्याचे ११६४८.७७
चौरस फूट क्षेत्रफळाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. यामध्ये १६
कक्षांसह एक विद्युत कक्ष, कार्यालय, उपाहारगृह आणि भोजन कक्ष यांची सुविधा आहे.
या
वसतिगृहामुळे क्रीडा शिबिरे, प्रशिक्षण तसेच विविध स्पर्धांसाठी विद्यापीठात
येणाऱ्या क्रीडापटूंच्या निवासासाठी कायमस्वरुपी सुविधा उभारण्याचा मानस
प्रत्यक्षात साकारल्याबद्दल कुलगुरू डॉ. शिर्के यांनी समाधान व्यक्त केले. क्रीडा
व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. शरद बनसोडे यांनी स्वागत करून वसतिगृहाची माहिती
दिली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता हेमा जोशी, कंत्राटदार सतीश
घोरपडे, मुंबईच्या साई प्रोजेक्ट कन्सल्टंट या आर्किटेक्ट कंपनीचे संदीप शेखर,
अष्टविनायक इलेक्ट्रीकल्सचे राम बुधाजी खन्नुकर यांचा कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या
हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास
प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व
मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी
पाटील, डॉ. गिरीष कुलकर्णी, डॉ. राजेंद्र
रायकर, सुभाष पवार, सुचय खोपडे, अभियांत्रिकी
विभागाचे उपकुलसचिव रणजीत यादव, विजय पोवार, वैभव आर्डेकर, विद्युत अभियंता अमित
कांबळे, शिवकुमार ध्याडे यांच्यासह क्रीडा अधिविभागाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी,
कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. किरण पाटील
यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment