शिवाजी विद्यापीठाच्या कौशल्य व उद्योजकता विकास केंद्रातर्फे आयोजित 'असेल तिथे, दिसेल त्याला' कौशल्य प्रशिक्षण उपक्रमांतर्गत विद्यार्थी-विद्यार्थिनींना कौशल्य प्रदान करताना प्रशिक्षक. |

कोल्हापूर, दि. २६ सप्टेंबर: ‘असेल तिथे, दिसेल त्याला’ कौशल्य
प्रशिक्षण हा अत्यंत अभिनव स्वरुपाचा उपक्रम असून दर आठवड्याला विद्यापीठात तो
सातत्याने राबविला गेल्यास अनेक विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल, असे प्रतिपादन
शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या कौशल्य व उद्योजकता विकास केंद्राच्या वतीने आज
विद्यापीठ परिसरात ‘असेल तिथे, दिसेल
त्याला’ कौशल्य प्रशिक्षण या अभिनव उपक्रमाचे आज आयोजन करण्यात आले. त्याचे
औपचारिक उद्घाटन प्र-कुलगुरू डॉ. शिर्के आणि कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांच्या
हस्ते झाले. विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर झालेल्या या कार्यक्रम
प्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. शिर्के बोलत होते.
डॉ. शिर्के म्हणाले, विद्यापीठाच्या कौशल्य विकास केंद्रातर्फे या
उपक्रमामध्ये सातत्य राहण्याच्या दृष्टीने आठवड्यातून एकदा विद्यापीठातील सर्व वसतिगृहांमधील
विद्यार्थ्यांसाठी तसेच केंद्रामध्ये सुद्धा इच्छुक विद्यार्थ्यांसाठी आठवड्याला
एक या प्रमाणे कौशल्य प्रदान उपक्रम राबविण्यात यावा. विद्यार्थ्यांनी सुद्धा केंद्राच्या
या उपक्रमांना भरभरून प्रतिसाद देऊन त्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी
केले.
कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर म्हणाले, विद्यार्थ्यांना पारंपरिक
शिक्षणाच्या बरोबरीने विविध कौशल्ये ज्ञात असावीत, यादृष्टीने विद्यापीठाने गेल्या
काही वर्षांत सातत्याने कौशल्यविषयक उपक्रम राबविले आहेत. त्याचे अत्यंत सकारात्मक
परिणामही दिसून येत आहेत. या केंद्राकडून भावी काळातही विद्यार्थ्यांसाठी असे
नवनवीन उपक्रम राबविण्याचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले.
केंद्राचे समन्वयक डॉ. ए.एम. गुरव या उपक्रमाविषयी माहिती देताना
म्हणाले, विद्यापीठाच्या या परिसरात विद्यार्थी, पालक, कर्मचारी, शिक्षक अगर
नागरिक असा चार किंवा अधिक जणांचा समूह असेल, त्याला जाग्यावर प्रशिक्षण दिले
जाणार आहे. त्यासाठी इन्फोसिसच्या माध्यमातून ‘ट्रेन द
ट्रेनर्स’ कार्यशाळेतून प्रशिक्षण घेतलेले प्रशिक्षक ही
कौशल्ये प्रदान करणार आहेत. प्राथमिक स्तरावर सॉफ्ट स्कील प्रदान करण्यात येणार
आहेत. अशा प्रकारचा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारे हे देशातील पहिले विद्यापीठ असेल,
असेही त्यांनी सांगितले.
यावेळी प्र-कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते प्रशिक्षकांना पुस्तक
भेट देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रसंगी अधिसभा सदस्य पंकज मेहता, मराठी
अधिविभाग प्रमुख डॉ. रणधीर शिंदे, डॉ. के.व्ही. मारुलकर, डॉ. केबी. पाटील, डॉ.
गजानन राशिनकर, एम.व्ही. चव्हाण, शिवप्रसाद शेटे, विजयकुमार मुत्नाळे, विजय
तिवारी, शिवप्रसाद बेकनाळकर, श्री. लिटॉन आदींसह १५ प्रशिक्षक उपस्थित होते.
या प्रशिक्षणानंतर लगेचच मुख्य प्रशासकीय इमारतीपासूनच प्रशिक्षण
उपक्रमास सुरवात झाली. प्रशिक्षकांनी सामोऱ्या आलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना
सॉफ्ट स्कील डेव्हलपमेंट संदर्भात मार्गदर्शन दिले.
No comments:
Post a Comment