कुलगुरू, प्र-कुलगुरूंचा समावेश; प्र-कुलगुरूंचा एच इंडेक्स सर्वाधिक ८४
डॉ. दिगंबर शिर्के, कुलगुरू |
डॉ. प्रमोद पाटील, प्र-कुलगुरू |
कोल्हापूर, दि.
३ सप्टेंबर: जागतिक पातळीवरील संशोधकांची क्रमवारी ‘ए.डी. सायंटिफिक इंडेक्स-२०२३’
नुकतीच जाहीर करण्यात आली. या जागतिक संशोधकांच्या अद्यावत क्रमवारीत शिवाजी
विद्यापीठातील कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील
यांच्यासह एकूण ९६ वैज्ञानिक, संशोधकांचा समावेश झालेला आहे.
प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांचा एच इंडेक्स विद्यापीठात सर्वाधिक ८४ इतका आहे.
अमेरिकेतील मिशीगन विद्यापीठामार्फत हा
निर्देशांक सन २०२१ पासून दरवर्षी जाहीर करण्यात येत आहे. पहिल्या वर्षीपासून
शिवाजी विद्यापीठातील संशोधकांनी या यादीमध्ये स्थान प्राप्त केले आहे. सन
२०२१मध्ये ४८, सन २०२२ मध्ये ८०, मार्च २०२३मध्ये ९२
आणि आता ९६ अशा चढत्या क्रमाने विद्यापीठातील संशोधकांची या यादीमधील संख्या वाढत
राहिली आहे.
अमेरिकेच्या मिशीगन विद्यापीठातील
प्रा. मूरत आल्पर आणि प्रा. सिहान डॉजर या दोघांनी संयुक्तपणे ‘आल्पर-डॉजर
सायंटिफीक इंडेक्स’ तथा ‘ए.डी. सायंटिफिक इंडेक्स’ विश्लेषित केलेला आहे. त्यासाठी
त्यांनी गुगल स्कॉलरवरील संशोधकांचा गेल्या पाच वर्षांतील एच-इंडेक्स, आय-टेन
इंडेक्स हे निर्देशांक तसेच सायटेशन स्कोअर (उद्धरणे) इत्यादी बाबींचे पृथक्करण
केले. एकूण ५५ देश, १०,८८६ विद्यापीठे आणि ४ लाख ४ हजार
२२८ शास्त्रज्ञांच्या संशोधकीय कामगिरीचे विश्लेषण करून एच इंडेक्स, आय
१० इंडेक्स आणि सायटेशन इत्यादी शास्त्रीय निकषांवर व्यक्ती आणि संस्थांची उत्पादकता
आणि कार्यक्षमता यांचे मूल्यांकन केले जाते.
या रँकिंगमध्ये शिवाजी विद्यापीठातील
एकूण ९६ संशोधक-प्राध्यापकांचा समावेश झाला आहे. गुगल स्कॉलर सायटेन्शनच्या आधारे
काढण्यात आलेल्या निर्देशांक यादीत गेल्या वर्षीच्या संशोधकांनी आपले स्थान कायम
राखले आहे. या यादीत प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांचा सर्वोत्कृष्ट शास्त्रज्ञ असा
उल्लेख करण्यात आलेला आहे. क्रमवारीत रसायनशास्त्र १३, पदार्थ
विज्ञान १०, जैवरसायनशास्त्र
५, इलेक्ट्रॉनिक्स ३, पर्यावरण शास्त्र ३, फूड
सायन्स २, वनस्पती शास्त्र ३, प्राणीशास्त्र
९,संख्याशास्त्र १, गणित १, नॅनो व तंत्रज्ञान ३, अभियांत्रिकी
आणि तंत्रज्ञान ७, मानव्यशास्त्र आणि भाषा विभाग ६.
अत्यंत व्यापक स्तरावर घेण्यात आलेल्या
या क्रमवारीमध्ये ‘अ++’ मानांकित शिवाजी विद्यापीठाच्या ९६ संशोधकांचा समावेश होणे
ही महत्त्वाची बाब आहे. या संशोधकांत स्थान प्राप्त करणारे कुलगुरू डॉ. दिगंबर
शिर्के संख्याशास्त्र विषयातील एकमेव संशोधक आहेत. प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील
यांनी मटेरियल सायन्स, सौरघट, इलेक्ट्रोमॅग्नेटिझम, गॅस
सेन्सर आणि नॅनोविज्ञान व तंत्रज्ञानातील संशोधनासाठी क्रमवारीत आघाडीचे स्थान
कायम राखले आहे.
या संदर्भात कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के
यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे की, ‘ए.डी.
सायंटिफिक इंडेक्स’मध्ये संशोधकांची संख्या वर्षागणिक वाढते आहे, ही
अतिशय समाधानाची बाब आहे. विद्यापीठासह संलग्नित महाविद्यालयांतील संशोधकांचे हे
कार्य अभिनंदनीय आहे. शिवाजी विद्यापीठात विविध विषयांत सुरू असणाऱ्या अखंडित
संशोधनामुळेच या यादीतील संशोधकांची संख्या वाढते आहे. यापुढील काळातही
विद्यापीठासह संलग्नित महाविद्यालयांतील संशोधकांनी आपले संशोधनकार्य जोमाने करीत
राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
ए.डी. सायंटिफिक इंडेक्समध्ये स्थान
प्राप्त करणाऱ्या संशोधकांची नावे पुढीलप्रमाणे:
पदार्थविज्ञान शास्त्र- डॉ. प्रमोद पाटील, डॉ.
केशव राजपुरे, डॉ. सी. एच. भोसले, डॉ.
ए. व्ही. मोहोळकर, डॉ. आर. जी. सोनकवडे, डॉ.व्ही. आर. पुरी, डॉ.एम.
व्ही. टाकळे, डॉ. टी. जे. शिंदे, डॉ.एस.
बी. सादळे, डॉ.ए. बी. गडकरी, डॉ.
एस. एस. पाटील.
रसायनशास्त्र- डॉ. के. एम. गरडकर, डॉ.
एस. एस. कोळेकर, डॉ. ए. व्ही. घुले, डॉ.
एस. डी. डेलेकर, डॉ.जी.बी. कोळेकर, डॉ.
डी.एम.पोरे, डॉ. आर. एस. साळुंखे, डॉ.
एम. बी. देशमुख, डॉ. जी. एस. राशिनकर, डॉ.
डी. एच. दगडे, डॉ. एस. एम. पाटील, डॉ. व्ही. व्ही.
गावडे.
जैवरसायनशास्त्र- डॉ. एस. पी.
गोविंदवार, डॉ. जे. पी. जाधव, डॉ.
के. डी. सोनवणे, डॉ. पी. बी. दंडगे, डॉ.
पी. के. पवार.
इलेक्ट्रॉनिक्स- डॉ. टी. जी. डोंगळे, डॉ.
एस. आर. सावंत, डॉ. पी. एन. वासंबेकर, डॉ.
आर. आर. मुधोळकर.
वनस्पतीशास्त्र- डॉ.एन. बी. गायकवाड, डॉ.
डी. के. गायकवाड, डॉ.
एस. जी. घाणे, डॉ. आर. व्ही. गुरव.
प्राणीशास्त्र- डॉ. एम. व्ही.
शांताकुमार, डॉ. टी.व्ही. साठे, डॉ. के. मोरे, डॉ.
एम. बी. भिलावे, डॉ. एस. एम. गायकवाड, डॉ.
एन. ए. कांबळे, डॉ. एम. व्ही. वाळवेकर, डॉ.
ए. ए. देशमुख.
पर्यावरणशास्त्र- डॉ. पी. डी. राऊत, डॉ.
विजय कोरे, डॉ. सोनल चोंदे.
अन्न विज्ञान व अभियांत्रिकी- डॉ. ए.के.
साहू, डॉ.
आर.सी. रणवीर.
संख्याशास्त्र- डॉ. डी. टी. शिर्के.
गणित शास्त्र- डॉ. के. डी. कुच्चे.
नॅनोसायन्स व तंत्रज्ञान- डॉ. के.के.
शर्मा, डॉ. पी. जे. कसबे, डॉ. मेघा देसाई.
फार्मसी- डॉ. जॉन डिसूझा, डॉ.ए.एस.
पायघन.
मानव्यविद्या आणि भाषा विभाग – डॉ. एम.
एस. देशमुख, डॉ. मेघा नानिवडेकर, डॉ.
तृप्ती करेकट्टी, डॉ. पी.एस. कांबळे, डॉ.
के. व्ही. मारुलकर.
अभियांत्रिकी व तंत्रज्ञान- डॉ. व्ही.
ए. सावंत, डॉ. एस. आर. यंकंच्ची, डॉ.
यू.आय. बोंगळे, डॉ.आय.एस. उडचण, डॉ.एच
पंडित.
भूगोल- डॉ. यश शिंदे, डॉ.
सचिन पन्हाळकर.
संगणक शास्त्र - डॉ. के. खराडे, डॉ.
के. एस. ओझा.
No comments:
Post a Comment