Thursday 7 September 2023

उमाजीराजे नाईक जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठात अभिवादन

 




कोल्हापूर, दि. ७ सप्टेंबर: आद्यक्रांतीवीर उमाजीराजे नाईक यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठात आदरांजली वाहण्यात आली.

विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवनात कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते उमाजीराजे नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक डॉ. प्रकाश गायकवाड, जैवतंत्रज्ञान अधिविभागाच्या प्रमुख डॉ. ज्योती जाधव, तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक डॉ. शिवलिंगप्पा सपली, जैवतंत्रज्ञान विभागाचे इन्सा फेलो डॉ. व्ही.ए. बापट, डॉ. दीप्ती खुर्रे, डॉ. ओंकार अपिने, डॉ. निलेश तरवाळ, नितीन नाईक, गजानन नाईक, विक्रम कानुगडे यांच्यासह संशोधक तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment