आदित्य सावळकरची पश्चिम विभागीय स्पर्धेसाठी निवड
विद्यापीठस्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत सर्वसाधारण विजेत्या संघाचे अभिनंदन करताना कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडलाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव व डॉ. प्रल्हाद जाखले |
कोल्हापूर, दि. ३१ ऑक्टोबर: डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ
इंजीनियरिंग येथे झालेल्या शिवाजी विद्यापीठस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये विद्यापीठाच्या संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. त्याचबरोबर विद्यापीठाच्या बीए-स्पोर्ट्सचा विद्यार्थी आदित्य मुकुंद सावळकर याने स्पर्धेत वैयक्तिक प्रथम क्रमांक पटकावून आंतरविभागीय स्पर्धेमध्ये
प्रवेश मिळवला. विजेत्या संघाचा सत्कार विद्यापीठाचे
कुलसचिव डॉ. विलास शिंदे, तसेच परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांच्या
हस्ते करण्यात आला. विजयी संघामध्ये आदित्य मुकुंद सावळकर याच्यासह सत्यजीत सुरेश
माने, राहुल मरगु लोखंडे आणि श्रीधर शिवाजी निंबाळकर
यांचा समावेश आहे.
यानंतर सावित्रीबाई
फुले महिला महाविद्यालय, सातारा येथे दि. २७ ते २९ ऑक्टोबर या कालावधीत पार पडलेल्या आंतरविभागीय बुध्दिबळ स्पर्धेत आदित्य मुकुंद सावळकर याने चतुर्थ क्रमांक पटकावला. त्याची पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाच्या संघात निवड झाली. क्रीडा व शारीरिक
शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शरद बनसोडे यांचे मार्गदर्शन लाभले.
No comments:
Post a Comment