कोल्हापूर, दि. २७
डिसेंबर: महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते डॉ. पंजाबराव देशमुख
यांची जयंती आज शिवाजी विद्यापीठात उत्साहात साजरी करण्यात आली.
विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील आणि
प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्या हस्ते डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या
प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक
डॉ. अजितसिंह जाधव, अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी
संचालक डॉ. प्रकाश गायकवाड, तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक डॉ. एस.एन. सपली, डॉ.
निखिल गायकवाड, डॉ. मनोज लेखक यांच्यासह प्रशासकीय अधिकारी व सेवक मोठ्या संख्येने
उपस्थित होते.
No comments:
Post a Comment