कोल्हापूर, दि. ६
डिसेंबर: भारतरत्न डॉ.
बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज शिवाजी विद्यापीठात
त्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची
राष्ट्रनिष्ठा, ग्रंथप्रेम आणि ज्ञानसंपादनाप्रती प्रचंड प्रेम या बाबी आजच्या
पिढीसाठी मार्गदर्शक व अनुकरणीय आहेत, असे उद्गार कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी
या प्रसंगी काढले.
विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्रामध्ये आयोजित
अभिवादन कार्यक्रम प्रसंगी कुलगुरू डॉ. शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील
यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
त्यानंतर उपस्थितांनी प्रतिमेस पुष्प वाहून महामानवाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक
डॉ. अजितसिंह जाधव, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता तथा आंबेडकर
केंद्राचे प्रमुख डॉ. श्रीकृष्ण महाजन, तंत्रज्ञान अधिविभागाचे संचलक डॉ. एस.एन.
सपली यांच्यासह अधिविभागातील शिक्षक, प्रशासकीय सेवक मोठ्या संख्येने उपस्थित
होते.
No comments:
Post a Comment